Remove ads
युनायटेड स्टेट्सचे ४१वे अध्यक्ष (१९८९-९३) From Wikipedia, the free encyclopedia
जॉर्ज हर्बर्ट वॉकर बुश (इंग्लिश: George Herbert Walker Bush) (१२ जून, इ.स. १९२४ - हयात) हा अमेरिकेचा ४१वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २० जानेवारी, इ.स. १९८९ ते २० जानेवारी, इ.स. १९९३ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. अध्यक्षीय कारकिर्दीआधी हा रॉनल्ड रेगन याच्या अध्यक्षीय राजवटीत इ.स. १९८१ ते इ.स. १९८९ या कालखंडात अमेरिकेचा ४३वा उपराष्ट्राध्यक्ष होता. तत्पूर्वी हा अमेरिकी प्रतिनिधिगृहात इ.स. १९६७ ते इ.स. १९७१ या काळात टेक्सासाचा प्रतिनिधी होता. इ.स. १९७६ ते इ.स. १९७७ या काळात याने सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी, अर्थात सीआयए या गुप्तचरसंस्थेच्या संचालकपदाचीही धुरा वाहिली.
जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश | |
४१ वे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष | |
---|---|
कार्यकाळ दिनांक २०-१-१९८९ – ते २०-१-१९९३ | |
उपराष्ट्रपती | डॅन क्वेल |
मागील | रॉनल्ड रेगन |
पुढील | बिल क्लिंटन |
जन्म | १२ जून, १९२४ मिल्टन , मॅसेच्युसेट्स, अमेरिका |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
राजकीय पक्ष | रिपब्लिकन पक्ष |
पत्नी | बार्बरा पीयर्स बुश |
गुरुकुल | येल विद्यापीठ |
धर्म | ख्रिश्चन |
सही |
अमेरिकेची सेनेटसदस्य प्रेस्कॉट बुश व त्याची पत्नी डॉरथी वॉकर बुश या जोडप्याच्या पोटी मॅसेच्युसेट्स संस्थानातील मिल्टन गावी जॉर्ज याचा जन्म झाला. इ.स. १९४१मधल्या पर्ल हार्बरावरील हल्ल्यानंतर जॉर्ज बुश महाविद्यालयीन शिक्षण सोडून वयाच्या १८व्या वर्षी अमेरिकी नौदलात वैमानिक म्हणून दाखल झाला. दुसऱ्या महायुद्धात युद्धाच्या समाप्तीपर्यंत तो आघाडीवर लढला. युद्धानंतर त्याने येल विद्यापीठात प्रवेश मिळवून इ.स. १९४८ साली पदवी अभ्यासक्रम पुरा केला. यानंतर तो आपल्या कुटुंबासह टेक्सास संस्थानात हलला. तेथे त्याने खनिज तेल उद्योगात शिरून धंद्यात जम बसवला. स्वतःचा तेलउद्योग स्थापल्यानंतर तो राजकारणातही सहभाग घेऊ लागला. अमेरिकी प्रतिनिधिगृहात त्याने टेक्सास संस्थानाचे प्रतिनिधित्व केले.
अध्यक्षीय कारकिर्दीत जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश याला आंतरराष्ट्रीय राजकारणास कलाटणी देणाऱ्या अनेक घडामोडी व प्रसंग हाताळावे लागले : इ.स. १९८९ साली बर्लिन भिंत पाडली गेली, दोनच वर्षांमध्ये सोव्हिएत संघ विसर्जिण्यात आला, इ.स. १९९०-९१ सालांमध्ये आखाती युद्धात झाले. देशांतर्गत आघाडीवर बुश प्रशासनाला संसदेने आधी संमत केलेले करवाढीची विधेयके मंजूर करावी लागली. आर्थिक प्रश्नांमुळे इ.स. १९९२ सालतल्या अध्यक्षीय निवडणुकींत त्याला डेमोक्रॅट उमेदवार बिल क्लिंटन याच्याविरुद्ध हार पत्करावी लागली.
अमेरिकेचा ४३वा राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश व फ्लोरिडा संस्थानाचा ४३वा गव्हर्नर जेब बुश हे त्याचे पुत्र आहेत.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.