Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
जॉर्ज वॉकर बुश, अर्थात जॉर्ज डब्ल्यू. बुश, (इंग्लिश: George Walker Bush ;) (६ जुलै, इ.स. १९४६; न्यू हॅवन, कनेटिकट, अमेरिका - हयात) हे अमेरिकेचे ४३वे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी २० जानेवारी, इ.स. २००१ ते २० जानेवारी, इ.स. २००९ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. तत्पूर्वी ते इ.स. १९९५ ते इ.स. २००० या काळात टेक्सासाचा ४६वे गव्हर्नर होते. बुश रिपब्लिकन पक्षाचे सदस्य आहेत.
जॉर्ज डब्ल्यू. बुश | |
कार्यकाळ दिनांक २०-१-२००१ – ते २०-१-२००९ | |
उपराष्ट्रपती | डिक चेनी |
मागील | क्लिंटन |
पुढील | ओबामा |
जन्म | ६ जुलै, १९४६ न्यू हेवन, कनेटिकट, अमेरिका |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
राजकीय पक्ष | रिपब्लिकन पक्ष |
पत्नी | लॉरा बुश |
गुरुकुल | येल विद्यापीठ, हार्वर्ड विद्यापीठ |
धर्म | एपिस्कोपल (१९७७ पर्यंत), युनायटेड मेथोडिस्ट (१९७७ पासून)* |
सही | |
एपिस्कोपल आणि युनायटेड मेथोडिस्ट हे दोन्ही ख्रिश्चन धर्माच्या प्रोटेस्टंट पंथाचे उपपंथ आहेत. |
अमेरिकेचे ४१वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश व त्यांची पत्नी बार्बारा बुश यांच्या पोटी न्यू हॅवन, कनेटिकट येथे त्यांचा जन्म झाला. माजी राष्ट्राध्यक्षांचा पुत्र असलेले हे दुसरे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आहेत. फ्लोरिडा संस्थानाचे ४३वे गव्हर्नर जेब बुश हे त्यांचे भाऊ आहेत.
जॉर्ज बुश यांनी इ.स. १९६८ साली येल विद्यापीठातून, तर इ.स. १९७५ साली हार्वर्ड बिझनेस स्कुलातून पदवी अभ्यासक्रम पुरा केला. त्यानंतर त्यांनी काही काळ खनिज तेल उद्योग सांभाळला. टेक्सास संस्थानाच्या गव्हर्नरपदासाठी झालेल्या इ.स. १९९४ सालातल्या निवडणुकीत त्यांनी डेमोक्रॅट उमेदवार अॅन रिचर्ड्स यांच्यावर मात करत निवडणूक जिंकली. इ.स. २००० सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींत तत्कालीन उपराष्ट्राध्यक्ष व डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार अल गोर यांना हरवत ते अध्यक्षपदावर निवडून आले.
बुश यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीचे अवघे आठ महिने झाले असताना सप्टेंबर ११, इ.स. २००१ चे दहशतवादी हल्ले झाल्यामुळे बुश प्रशासनाने दहशतवादाचा सामना करण्यास प्राधान्य दिले. बुश प्रशासनाने दहशतवादाविरुद्ध जागतिक युद्ध घोषित करून इ.स. २००१ साली इस्लामी मूलतत्त्ववाद्यांना आश्रय देत असल्याचा आरोप करत अफगाणिस्तानावर, तर इ.स. २००३ साली इराकावर आक्रमण केले. बुश यांच्या दुसऱ्या अध्यक्षीय मुदतीत इ.स. २००८ सालातल्या मंदीमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था अडचणीत आली. आर्थिक प्रश्न आणि इराक व अफगाणिस्तानातील लांबत गेलेल्या युद्धांची व्यवहार्यता, यांमुळे त्यांची लोकप्रियता दुसऱ्या मुदतीत ओसरू लागली.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.