घनसावंगी विधानसभा मतदारसंघ - १०० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार घनसावंगी मतदारसंघात जालना जिल्ह्यातील १. घनसावंगी तालुका, २. जालना तालुक्यातील विरेगांव आणि पाचणवडगांव ही महसूल मंडळे आणि ३. अंबड तालुक्यातील वडी गोद्री आणि गोंदी ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. घनसावंगी हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश भैय्या अंकुशराव टोपे हे घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ | ||
---|---|---|
colspan=3 घनसावंगी | ||
उमेदवार | पक्ष | मत |
राजेश टोपे | राष्ट्रवादी | १,०४,२०६ |
अर्जुन पंडितराव खोतकर | शिवसेना | ८०,८९९ |
राजेंद्र काळुबा हिवळे | रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) | २,१६५ |
मुनवरखॉं गुलखॉं पठाण | अपक्ष | २,१३१ |
सय्यद महंमद शेख अहमद शेख | अपक्ष | १,७७४ |
श्रीहरी यादवराव जगताप | अपक्ष | ५१९ |
बाबासाहेब पाटील शिंदे | अपक्ष | ५०६ |
संदर्भ
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.