आनंद अभ्यंकर

भारतीय अभिनेता From Wikipedia, the free encyclopedia

आनंद मोरेश्वर अभ्यंकर (जन्म : २ जून १९६३]]; - २३ डिसेंबर २०१२) हा मराठी चित्रपट, नाटके व दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेता होता. "असंभव", "मला सासू हवी" इत्यादी मराठी दूरचित्रवाणी मालिकांमधील त्याच्या भूमिका विशेष गाजल्या.

जलद तथ्य आनंद अभ्यंकर, जन्म ...
आनंद अभ्यंकर
जन्म आनंद मोरेश्वर अभ्यंकर
२ जून, इ.स. १९६३
नागपूर, महाराष्ट्र
मृत्यू २३ डिसेंबर, इ.स. २०१२
मुंबई–पुणे द्रुतगतिमार्ग (अपघात)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ - २०१२
भाषा मराठी
वडील मोरेश्वर अभ्यंकर
बंद करा

जीवन

आनंद अभ्यंकर मूळचे नागपूरचे, त्याचे शालेय शिक्षण नागपुरातील नूतन भारत शाळेत [१] झाले; तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील गरवारे महाविद्यालयात [२] झाले.

कारकीर्द

चित्रपट-कारकीर्द

अधिक माहिती वर्ष (इ.स.), चित्रपट ...
वर्ष (इ.स.)चित्रपटभाषाभूमिकाटिप्पणी
इ.स. १९९९वास्तवहिंदी
इ.स. २०००जिस देश में गंगा रहता हैहिंदी
इ.स. २००१अकलेचे कांदेमराठी
तेरा मेरा साथ रहेहिंदी
इ.स. २००४कुंकू लावते माहेरचंमराठीदिनकर देशमुख
इ.स. २००६मातीच्या चुलीमराठी
ही पोरगी कुणाचीमराठी
इ.स. २००८चेकमेटमराठी
एक विवाह... ऐसा भीहिंदी
इ.स. २००९चल चलेहिंदीवैष्णवीचे वडील
इ.स. २०१०पप्पू कान्ट डान्स सालाहिंदी"आनंद अभ्यंकर" म्हणून
इ.स. २०११बालगंधर्वमराठी
इ.स. २०१२स्पंदनमराठी
आनंदाचे झाडमराठी
आयडियाची कल्पनामराठी
बंद करा

दूरचित्रवाणी-कारकीर्द

अधिक माहिती वर्ष (इ.स.), कार्यक्रम ...
वर्ष (इ.स.)कार्यक्रमभाषाभूमिका/सहभागटिप्पणी
इ.स. २००४या गोजिरवाण्या घरातमराठी
इ.स. २००८असंभवमराठीदीनानाथ शास्त्री
अवघाची संसारमराठी
इ.स. २०१०शुभंकरोतिमराठी
इ.स. २०११तारक मेहता का उल्टा चश्माहिंदीभाऊकाका
इ.स. २०१२फू बाई फूमराठी
मला सासू हवीमराठीआबा
बंद करा

मृत्यू

एका चित्रीकरणाचे काम आटोपून पुण्याहून मुंबईकडे प्रवास करत असताना अभ्यंकरांच्या कारला २३ डिसेंबर, इ.स. २०१२ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास मुंबई–पुणे द्रुतगतिमार्गावरील उर्से टोलनाक्याजवळ अपघात झाला. त्यांच्या सोबत असलेला सहअभिनेता अक्षय पेंडसे याचा [३]. दुर्घटनास्थळीच मृत्यू झाला. तर निगडीतल्या लोकमान्य इस्पितळातील उपचारांदरम्यान आनंद अभ्यंकर याचेही निधन झाले. [३].

आनंद अभ्यंकर मित्र परिवार

२०१३ सालापासून, आनंद अभ्यंकर मित्र परिवारातर्फे रंगभूमीची सेवा करणाऱ्या कलावंताला किंवा कार्यकर्त्याला दरवर्षी आनंदरंग पुरस्कार देण्यात येतो.

  • २०१३ साली रंगकर्मी दिनेश गोसावी यांना पहिला आनंदरंग पुरस्कार पुरस्कार देण्यात आला.
  • २०१४ सालचा पुरस्कार शिवाजी मंदिरातील चहावाले बाळू वासकर यांना प्रदान झाला.
  • २०१५साली मोहम्मद चाचा याना हा पुरस्कार मिळाला.
  • २०१६ साली हा पुरस्कार पडद्यामागचे कलाकार विठ्ठल हुलावळे यांना देण्यात आला.

संदर्भ व नोंदी

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.