Remove ads
हिंदू धर्मातील चौथा वेद From Wikipedia, the free encyclopedia
अथर्ववेद हा चार प्रमुख वेदांपैकी एक आहे. हा ग्रंथ चार वेदांपैकी सगळ्यात शेवटी म्हणजे इ.स.पूर्व ६००० या काळात लिहिला गेल्याचे मानले जाते. आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे.आयुर्वेद हा विष्णू अवतार धन्वंतरी यांनी आयुर्वेदाची रचना केली. अथर्ववेदात तत्त्वज्ञानाबरोबर जीवनातील अडचणी, औषधी वनस्पती आणि संकटावरील उपायांचीही माहिती आहे. समाजातील सर्व थरांमध्ये, तसेच भारतातील सर्व धर्मांमध्ये अथर्ववेदीय उपासनांचा प्रचार आजही दिसतो.
हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग | |
वेद | |
---|---|
ऋग्वेद · यजुर्वेद | |
सामवेद · अथर्ववेद | |
वेद-विभाग | |
संहिता · ब्राह्मणे | |
आरण्यके · उपनिषदे | |
उपनिषदे | |
ऐतरेय · बृहदारण्यक | |
ईश · तैत्तरिय · छांदोग्य | |
केन · मुंडक | |
मांडुक्य ·प्रश्न | |
श्वेतश्वतर ·नारायण | |
कठ | |
वेदांग | |
शिक्षा · छंद | |
व्याकरण · निरुक्त | |
ज्योतिष · कल्प | |
महाकाव्य | |
रामायण · महाभारत | |
इतर ग्रंथ | |
स्मृती · पुराणे | |
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई | |
पंचतंत्र · तंत्र | |
स्तोत्रे ·सूक्ते | |
मनाचे श्लोक · रामचरितमानस | |
शिक्षापत्री · वचनामृत |
हा वेद ऋषी अथर्व यांनी लिहीला आहे. हा वेद सोडून सर्व वेद ब्रह्म देवाने त्यांच्या मुखातून सांगून लिहीले आहे. ज्यावेळी ते निद्रेत होते याला शंकर देवाने चौथ्या वेदाच्या रूपात मान्यता दिली.
भारतीय संस्कृती-इतिहासात चतुर्थ वेद म्हणून मान्यता पावलेला,परंतु परंपरागत ब्राह्मण वर्गाने वेद त्रयीमध्ये समावेश करण्यास नाकारलेला अथर्ववेद, यज्ञीय धर्मसाधनेच्या दृष्टीने ऋग्वेदाहून कमी महत्त्वाचा असला, तरी भारतीय लोकसाहित्याचा आद्य स्रोत या दृष्टीने सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या तो ऋग्वेदाहूनही अधिक महत्त्वाचा आहे. सर्वंकष समाजाभिमुखता हे अथर्व वेदाचे प्रमुख वैशिष्ट्य असून, समाजातील निष्कांचन ग्रामीण जनतेपासून उच्चपदस्थ राजा-महाराजांपर्यंतच्या समस्त वर्गांचा परामर्श या ग्रंथात आढळतो.
अथर्ववेद हा अथर्वन आणि अंगिरस या दोन ऋषि समूहांनी रचला म्हणून यास अथर्वांगिरस असे एक प्राचीन नाव आहे. वैदिक गोपथ ब्राम्हणाच्या लेखनकाळाच्या उत्तरार्धात हा भृगु आणि अंगिरस यांच्या नावाने ओळखला जाऊ लागला. याखेरीज परंपरेनुसार यातील काही रचनांचे श्रेय हे कौशिक, वसिष्ठ, कश्यप ह्या ऋषींनाही दिले जाते. अथर्वशिरस, घोरस्वरूपी अंगिरस, आथर्वण, क्षत्रवेद, ग्रामयाजिन, पूगयज्ञीय, ब्रह्मवेद, भेषज, भृगु अंगिरस, सुभेषज अशी याची विविध नवे आहेत.[१]
शौनकीय व पैपलाद या अथर्ववेदाच्या दोन शाखा आहेत. आयुर्वेद, राजधर्म, समाजव्यवस्था, अध्यात्म, तत्त्वज्ञान अशा विविध विषयांना अथर्ववेदाने स्पर्श केला आहे.
करण्यव्यूहांनी (शौनकीय) अथर्ववेदाच्या नऊ शाखा सांगितल्या अहेत.
यापैकी केवल शौनकीय शाखा गुजरात अणि वाराणसी येथे अस्तित्वात आहे, शेवटच्या काही दशकांन मध्ये ही सर्वत्र विस्तारते होते. आणि ओडिशा येथे पैपलाद ही टिकून आहे. अलीकडील काळात यात काही भर घालण्यात आली, परंतु पैपलादीय सहित्य हे शौनकीय साहित्यापेक्षा प्प्राचीन मानले जाते. अनेकदा अनुरूप स्तोत्रांमध्ये दोन आवर्तनामध्ये वेगवेगळे छंद पाहण्यात येतात, किंवा जे दुसऱ्या ग्रंथामध्ये नाहीत असे काही अधिक स्तोत्र एखाद्या प्रतीत आढळतात. पाच कल्पांपैकी संहिताविधी, शांतिकल्प, नक्षत्रकल्प हे काही कल्प स्वतंत्र शाखा म्हणून नसून दाखले म्हणून शौनकीय परंपरेत आढळतात. अथर्ववेदात विविध कालखंडाचे दीर्घ असे ७२ भागांची परिशिष्टे आहेत, त्यांतील बहुतेक सर्व पुराणकालीन आहेत.
अथर्ववेदाच्या उत्तरार्धात वैनतेय सूत्र आणि कौशिक सूत्र अशा दोन संबधित उत्तर संहिता आहेत.वैनतेय सूत्र हे अथर्ववैदिकांच्या श्रौत्र विधींमधील सहभागासंबधित आहे,तर कौशिकसूत्रातील अनेक सुत्रांमध्ये चिकित्सेसंबधित व तंत्रासंबधित माहिती आहे.ह्यांचा उद्देश ऋग्वेदामधील विधानांन समान आहे आणि म्हणुन अथर्ववैदिक साहित्यातिल उपायुक्ततेचा अभ्यास हा वैदिक काळात बहुमुल्य समजला गेला आहे.अथर्ववेदांशी संबधित सुद्धा अनेक उपनिषदे आहेत,परंतु परंपरेमध्ये अलिकडेच सामाविष्ट करण्यातआलेले अढळते.[ संदर्भ हवा ] यांमध्ये मुडंक आणि प्रश्न उपनिषद हे सर्वधिक महत्त्वाचे मानले गेले.त्यांतील पहिल्यामध्ये (मुडंकामध्ये)शौनकिय शाखेचा प्रमुख, शौनकांबद्दल महत्त्वाचा सदंर्भ मिळतो, तर नंतरचा(प्रश्न उपनिषदात) हा पैपलादिय शाखेशी संबंधित आहे.
भारतीय अभिचारविद्येचा आद्य स्रोत अथर्ववेदात आढळत असून, या ग्रंथात अंगभूत असणारी आंगिरसी विद्या हे अभिचार अथवा यातुविद्येचेच अन्य रूप होय. अथर्वविद्येतील यातुविद्येचे दोन आवडीचे विषय म्हणजे स्त्रीवशीकरण आणि रणभूमीतील शत्रूंचे निर्दालन हे होत. अभिचार, यातुविद्येसारख्या समस्त बऱ्या-वाईट आचारांची नोंद त्यामध्ये धर्मविधी म्हणून आढळते.
अथर्ववेद आणि त्याच्या कौशिकसूत्र संज्ञक याज्ञिक ग्रंथात वैदिक आर्यांच्या सामान्य जीवनाचे सर्वांगीण दर्शन घडत असून, त्यास पूरक साहित्य गृह्यसूत्रात आढळते. गृह, शेती, पशू, प्रेम आणि विवाह, व्यापार आणि ग्रामीण रीतिरिवाजासंबंधीची या ग्रंथातील माहिती गृह्यसूत्रांच्या तुलनेने सर्वंकष वाटते. अथर्ववेदातील राजकर्मणि सूक्ते, ब्राह्मणहितार्थ प्रार्थना, ब्रह्मशत्रूंना अभिशाप देणारी सूक्ते ही या वेदाची वैशिष्ट्ये आहेत.[२]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.