सप्तर्षींपैकी एक ऋषी, श्री दत्तात्रेयांचे पिता From Wikipedia, the free encyclopedia
अत्री हे वैदिक ऋषी आहेत, ज्यांना अग्नी, इंद्र आणि हिंदू धर्मातील इतर वैदिक देवतांसाठी असंख्य स्तोत्रे रचण्याचे श्रेय दिले जाते. अत्री हा हिंदू परंपरेतील सप्तर्षी (सात महान वैदिक ऋषी) पैकी एक आहे, आणि ऋग्वेदात सर्वात जास्त उल्लेख केलेला आहे.[1] ऋग्वेदातील पाचव्या मंडलाला (पुस्तक ५) त्याच्या सन्मानार्थ अत्री मंडल असे म्हणतात आणि त्यातील ऐंशी स्तोत्रे त्याला आणि त्याच्या वंशजांना दिली जातात.[2] अत्रीचा उल्लेख पुराण आणि रामायण आणि महाभारतातील हिंदू महाकाव्यांमध्येही आढळतो.[3][4]
अत्रि | |
वडील | ब्रह्मदेव |
पत्नी | अनसूया |
अपत्ये | दत्तात्रेय, दुर्वास आणि चंद्र |
अत्रि हे हिंदू पौराणिक कथा आणि वेदांमध्ये उल्लेखलेल्या सप्तर्षींपैकी एक ऋषी आहेत. ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र मानले जातात.[5] आकाशात दिसणाऱ्या सप्तर्षी नक्षत्रा मध्ये(Great Bear, Ursa Major, Big Dipper) अत्रि (Delta Ursae Majoris) हा एक तारा आहे. अत्रि ऋषींचा आश्रम राजगढ जिल्ह्यामधून वाहणाऱ्या निर्विंध्या नदीकिनारी होता.
भृगू (भ्राज् धातू म्हणजे अग्नीवर भाजणे) आणि अंगिरस (अग्नीतून निर्माण होणारा ज्वलनशील कोळसा) या शब्दांवरून अत्रि या शब्दाची व्युत्पत्ती अधिक स्पष्ट होते. अत्रींच्या जन्माचे निरुक्त आणि बृहददेवता यांमध्ये झालेले उल्लेख, बाकी कथांच्या मानाने अपूर्ण वाटणारे आहेत. अत्रिन् (नष्ट करणारे) हा शब्द वेदांत देवांचे शत्रू या अर्थानेही येतो, परंतु प्रत्यक्षात अत्रि हे देवांचे साहाय्यकर्ते सप्तर्षी होते हे समजून, अत्रि या शब्दाच्या व्युत्पत्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
अत्र या संस्कृत शब्दाचा अर्थ येथे म्हणजे स्थानिक असा होतो. प्रजापतीने केलेल्या वाक्यज्ञात भृगू आणि अंगिरस ऋषींच्या जन्मानंतर केवळ दोघेच का? असा प्रश्न केल्यानंतर अत्रींचा जन्म झाला. शौनकरचित बृहददेवता या ग्रंथानुसार वाक्(सरस्वती?) ही तिसऱ्या पुत्राची आशा करताना हा प्रश्न करते. तर अत्रि शब्दाच्या निरुक्तातील व्युत्पत्तीनुसार ‘तीन नाहीत’अशी पृच्छा स्वतः नवजात भृगू आणि अंगिरसच करतात.[6]
नष्ट करणे अथवा खाऊन टाकणे या अर्थाने वापरल्या जाणाऱ्या समानोच्चारी अद् या धातूपासून येणाऱ्या अत्ति शब्दाचा अर्थ रसनेंद्रिय (जिव्हा) असा होतो. वाक् ची निर्मिती मुखातून होते. अत्ति शब्दाचा अर्थ रसनेंद्रिय. त्यामुळे अत्रि शब्दाच्या व्युत्पत्तीमध्ये, या शब्दाचा मुखाशी संबध असेल का असा प्रश्न केला जातो.
(अत्त्री साचा:वैदिक संस्कृतमधील शब्द; जाणकार असल्याशिवाय शुद्धलेखन बदलू नका. या शब्दाचा अर्थ संसभाषण संस्कृत शब्दकोशात ‘नष्ट करणारा’ असा दिला आहे)आपटे संस्कृत डिक्शनरी त्रस्नु- (trasnu)अत्रस्त-अत्रास यापासून अत्रि म्हणजे Fearless अशी व्याख्या देते[7]
ऋक्ष(म्हणजे अस्वल) या शब्दाचा अर्थ (इंग्रजी bear) आकाशात दिसणाऱ्या (Great Bear) सप्तर्षी हा तारकापुंज असाही आहे. सप्तर्षींमधले बाकीचे तारे जोडीने असतात तर अत्री नावाचा तारा एकटाच असतो.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.