From Wikipedia, the free encyclopedia
अक्षीचा शिलालेख हा शा.श. ९३४ म्हणजेच इ.स. १०१२ मधील मराठीतील पहिला शिलालेख आहे [१]. हा शिलालेख रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळील अलिबाग-चौल रस्त्यावरील अक्षी या गावात आढळलेला आहे. पुरातत्त्वज्ञ डॉ. शं.गो. तुळपुळे यांच्या संशोधनाप्रमाणे तो मराठीतील पहिला शिलालेख आहे [२][३].
अक्षीचा शिलालेख मराठीतील आद्य शिलालेख असून त्यावर शके ९३४ म्हणजेच इ.स. १०१२ असा स्पष्ट उल्लेख आहे. शिलाहारवंशीय राजा पहिला केसीदेवराय याचा प्रधान भइर्जू सेणुई याच्या काळात म्हणजे शिलाहार काळात कोरलेला हा शिलालेख असून त्याने देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य दिल्याचा यात उल्लेख आहे. हा शिलालेख संस्कृत-मराठी मिश्र देवनागरी लिपीतील असून नऊ ओळींचा आहे. त्या नऊ ओळींच्या वर चंद्र-सूर्य कोरले आहेत. खाली शापवाणीचे चित्र कोरले आहे.
गीं सुष संतु । स्वस्ति ओं । पसीमस-
मुद्राधिपती । स्री कोंकणा चक्री-
वर्ती । स्री केसीदेवराय । महाप्रधा-
न भईर्जू सेणुई तसीमीनी काले
प्रव्रतमने । सकु संवतु: ९३४ प्रधा-
वी सवसरे: अधीकू दीवे सुक्रे बौ-
लु । भईजुवे तथा बोडणा तथा नऊ
कुवली अधोर्यु प्रधानु । महलषु-
मीची वआण । लुनया कचली ज-
जगी सुख नांदो.पश्चिम समुद्राधिपती श्री कोकणचक्रवर्ती, श्री केसीदेवराय याचा महाप्रधान भइर्जू सेणुई याने शक संवत ९३४ प्रभव संवत्सर अधिक कृष्ण पक्ष शुक्रवार या दिवशी भइर्जूने देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य नेमून दिले. लुनया कचली
“ | मराठी भाषेच्या उगम इतिहासातील सज्जड पुरावे म्हणजे कोरीव ताम्रपट आणि शिलालेख होत. त्या सर्वांवर काळाची नोंद नसली त्यांच्या अक्षरांच्या वळणावरुन त्या काळाची नोंद होऊ शकते. मराठी भाषेतील पहिला शिलालेख हा जैन दिगंबर पंथीय श्रवणबेळगोळ येथील बाहुबलीच्या पायथ्याशी असलेला शालिवाहन शके १०३८-३९ म्हणजेच इ.स. १११६-१७ सालातील
|
” |
पूर्वी हा ‘दगड’ रस्त्याच्या चिरणीत (गटारात) पडलेला होता. आज तो अक्षी ग्रामपंचायतीशेजारी उभा आहे. [४]
Seamless Wikipedia browsing. On steroids.