डिसेंबर २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५७ वा किंवा लीप वर्षात ३५८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सातवे शतक
- ६१९ - बॉनिफेस पाचवा पोपपदी.
अठरावे शतक
- १७८३ - जॉर्ज वॉशिंग्टनने कॉंटिनेंटल आर्मीचे सरसेनापतिपद सोडले.
एकोणिसावे शतक
- १८८८ - व्हिंसेंट व्हॅन गोने आपल्या डाव्या कानाची पाळी कापून रेचेल नावाच्या नगरवधूला भेट दिली.
विसावे शतक
- १९१३ - अमेरिकन अध्यक्ष वूड्रो विल्सनने फेडरल रिझर्व ॲक्टवर सही केली. फेडरल रिझर्व बँक अस्तित्वात.
- १९१६ - पहिले महायुद्ध-मगधाबाची लढाई - दोस्त सैन्याने साइनाई, इजिप्तमध्ये तुर्कीला पराभूत केले.
- १९२१ - शांतिनिकेतन येथे ’विश्व भारती’ विश्वविद्यालयाची स्थापना.
- १९४० - हिंदुस्तान एरक्राफ्ट लिमिटेड हा भारतातील पहिला विमाननिर्मितीचा कारखाना तत्कालिन म्हैसूर राज्यात बंगलोर येथे प्रसिद्ध उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी सुरू केला. 'हिंदुस्थान एरक्रॉफ्ट लिमिटेड' कंपनीचे पुढे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नामांतर झाले.
- १९४७ - बेल लॅबमध्ये प्रथमत: ट्रांझिस्टरचे प्रदर्शन.
- १९५४ - डॉ.जोसेफ ई. मरेने बॉस्टनच्या पीटर बेन्ट ब्रिगहॅम हॉस्पिटलमध्ये पहिले मानव मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पाडले.
- १९७० - वि. वा. शिरवाडकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ’नटसम्राट’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला.
- १९७२ - निकाराग्वाची राजधानी मानाग्वामध्ये ६.५ रिश्टरचा भूकंप. १०,०००हून अधिक ठार.
- १९७२ - उरुग्वेयन एर फोर्स फ्लाइट ५७१च्या उरलेल्या प्रवाशांना वाचविण्यात आले. अँडीज पर्वतरांगेवर विमान कोसळल्यावर ७२ दिवस अतिउंच व अतिथंड परिस्थितीत राहताना जगण्यासाठी प्रवाश्यांनी नाईलाजाने मानवमांस खाल्ले. २ प्रवाश्यांनी १० दिवस अतिकठीण डोंगर पार करून काही प्रवासी जिवंत असल्याची माहिती दिली.
- १९७९ - सोवियेत सैन्याने अफगाणिस्तानची राजधानी काबूल काबीज केले.
एकविसावे शतक
- २००० - कलकत्ता शहराचे नाव ’कोलकता’ असे बदलण्यास केंद्र सरकारची मंजूरी
- २००१ - बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. त्याची उंची १०४ फूट आहे.
- २००२ - इराकी मिग २५ प्रकारच्या विमानाने अमेरिकेचे एम.क्यू. १ प्रकारचे विमान पाडले. चालकविरहित लढाऊ विमानाने द्वंद्वयुद्धात भाग घेण्याची ही पहिलीच वेळ होती.
- २००४ - मॅकारी द्वीपांना रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.१ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का.
- २००५ - अझरबैजान एरलाइन्स फ्लाइट २१७ हे बाकूहून अक्टाऊ शहराकडे जाणारे विमान उड्डाण केल्यावर लगेचच कोसळले. २३ ठार.
- २००५ - डिसेंबर १८ला अड्रे शहरावर झालेल्या हल्ल्याला उत्तर म्हणून चाडने सुदानविरुद्ध युद्ध पुकारले.
जन्म
- १५३७ - योहान तिसरा, स्वीडनचा राजा.
- १७७७ - झार अलेक्झांडर पहिला, रशियाचा झार.
- १८०५ - जोसेफ स्मिथ, जुनियर, चर्च ऑफ जिझस क्राईस्ट ऑफ लॅटर डे सेंट्स(मोर्मोन चर्च)चा संस्थापक.
- १८४५ -- रासबिहारी घोष, प्रसिद्ध कायदेपंडित, देशभक्त. काँग्रेस पक्षाचे नेते आणि अध्यक्ष.
- १८९७ - कविचंद्र कालिचरण पटनाईक, ओडिशातील कवी, नाटककार व पत्रकार.
- १९०२ - चौधरी चरण सिंग, भारताचे ५ वे पंतप्रधान व लोकदल पक्षाचे संस्थापक.
- १९०२ - चौधरी चरण सिंग, भारताचे पाचवे पंतप्रधान.
- १९१८ - हेल्मुट श्मिट, जर्मनीचा चान्सेलर.
- १९३३ - अकिहितो, जपानचा सम्राट.
मृत्यू
- १९२६ - स्वामी श्रद्धानंद, स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, आर्य समाजाचे प्रसारक.
- १९६५ - गणपतराव बोडस, मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता.’गंधर्व नाटक मंडळी’चे एक संस्थापक
- १९७९ - दत्ता कोरगावकर, हिंदी व मराठी चित्रपट संगीतकार.
- १९९८ - रत्नाप्पा कुंभार, स्वातंत्र्यसैनिक, सहकारी चळवळ नेते, साखर कारखान्याचे अध्यक्ष, पद्मश्री (१९८५), खासदार (१९५२), आमदार (शिरोळ), महाराष्ट्राचे मंत्री, भारतीय राज्यघटना समितीचे सदस्य
- २००० - नूरजहाँ, पाकिस्तानी गायिका.
- २००४ - पी. व्ही. नरसिंहराव, भारतीय पंतप्रधान.
- २००८ - गंगाधर महांबरे, मराठी साहित्यिक.
- २०१० - ज्ञानेश्वर नाडकर्णी, मराठी कला समीक्षक व लेखक.
- २०१० - के. करुणाकरन, केंद्रीय उद्योगमंत्री, केरळचे मुख्यमंत्री व गृहमंत्री.
प्रतिवार्षिक पालन
- किसान दिन - भारत
- वर्धापनदिन : विश्वभारती विद्यापीठ (शांतिनिकेतन)
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर डिसेंबर २३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर २१ - डिसेंबर २२ - डिसेंबर २३ - डिसेंबर २४ - डिसेंबर २५ - (डिसेंबर महिना)
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.