![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/d/dc/1994_FIFA_World_Cup.svg/langmr-640px-1994_FIFA_World_Cup.svg.png&w=640&q=50)
१९९४ फिफा विश्वचषक
From Wikipedia, the free encyclopedia
१९९४ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची १५वी आवृत्ती अमेरिका देशामध्ये १७ जून ते १७ जुलै १९९४ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील १४७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी २४ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. ह्या स्पर्धेमधील एकूण प्रेक्षकसंख्या सुमारे ३६ लाख तर प्रति सामना प्रेक्षकसंख्या ६९ हजार होती जो विश्वचषकाच्या इतिहासामध्ये विक्रमी आकडा आहे.
जलद तथ्य स्पर्धा माहिती, यजमान देश ...
![]() | |
स्पर्धा माहिती | |
---|---|
यजमान देश |
![]() |
तारखा | १७ जून – १७ जुलै |
संघ संख्या | २४ |
स्थळ | ९ (९ यजमान शहरात) |
अंतिम निकाल | |
विजेता |
![]() |
उपविजेता |
![]() |
तिसरे स्थान |
![]() |
चौथे स्थान |
![]() |
इतर माहिती | |
एकूण सामने | ५२ |
एकूण गोल | १४१ (२.७१ प्रति सामना) |
प्रेक्षक संख्या | ३५,८७,५३८ (६८,९९१ प्रति सामना) |
← १९९० १९९८ → | |
बंद करा
पसाडेना येथे खेळवल्या गेलेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात ब्राझीलने इटलीला पेनल्टी शूटआउटमध्ये ३–२ असे पराभूत करून आपले चौथे अजिंक्यपद मिळवले.