१९९८ फिफा विश्वचषक
From Wikipedia, the free encyclopedia
१९९८ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची सोळावी आवृत्ती फ्रान्स देशामध्ये १० जून ते १२ जुलै १९९८ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ११६ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी ३२ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
जलद तथ्य Italia '90, स्पर्धा माहिती ...
Italia '90 | |
---|---|
स्पर्धा माहिती | |
यजमान देश | फ्रान्स |
तारखा | १० जून – १२ जुलै |
संघ संख्या | ३२ |
स्थळ | १० (१० यजमान शहरात) |
अंतिम निकाल | |
विजेता | फ्रान्स (१ वेळा) |
उपविजेता | ब्राझील |
तिसरे स्थान | क्रोएशिया |
चौथे स्थान | नेदरलँड्स |
इतर माहिती | |
एकूण सामने | ६४ |
एकूण गोल | १७१ (२.६७ प्रति सामना) |
प्रेक्षक संख्या | २७,८५,१०० (४३,५१७ प्रति सामना) |
सर्वोत्तम खेळाडू | रोनाल्डो |
← १९९४ २००२ → | |
बंद करा
सेंत-देनिसमधील स्ताद दा फ्रान्स येथे खेळवल्या गेलेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात यजमान फ्रान्सने ब्राझिलला ३–० असे पराभूत करून आपले प्रथम अजिंक्यपद मिळवले. यजमान देशाने विश्वचषक जिंकण्याची ही सहावी वेळ होती.