हनुमान ऊर्फ मारुती ही रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून ते श्री रामांचे महान भक्त, दास, दूत मानले जातात.[1]

जलद तथ्य
हनुमान
Thumb
हनुमान
निवासस्थानअंजनेरी पर्वत. त्रंबकेश्वर नाशिक‌
शस्त्रगदा
वडीलकेसरी
आईअंजनी
अन्य नावे/ नामांतरेहनुमंत, बजरंगबली, आंजनेय, पवनपुत्र, वायुपुत्र
मंत्रमारुतिस्तोत्र, हनुमान चालीसा
नामोल्लेखरामायण, महाभारत
तीर्थक्षेत्रेअंजनेरी पर्वत. त्र्यंबकेश्वर नाशिक.
विशेष माहितीरामाचा दूत व भक्त,
वानर
बंद करा

पौराणिक महत्त्व

त्यांचा जन्म अंजनी या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता असे मानले जाते. हे गाव व या नावाचा डोंगरी किल्ला महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यात आहे. मारुतीचे वडील केसरी. वीर मारुती हे अतिशय ताकदवान-महाबली होते. त्यांना अनेक शक्ती सिद्धी प्राप्त होत्या.

कथा

लहानपणी त्यांना भूक लागली असल्याने ते सूर्याला फळ समजून त्याला पकडण्याच्या इच्छेने सूर्याकडे धाव घेऊ लागले. परंतु सूर्याला पकडताच त्यांचे हात सूर्याच्या आगीने चळाचळा कापू लागले, त्यामुळे ते सूर्यापासून थोडे लांब झाले. परंतु त्यांना तो खेळच वाटू लागला, ते सारखा सूर्याला पकडायचे व सोडून द्यायचे. त्यामुळे सूर्यही त्यांना घाबरु लागला. असे करत करत त्यांनी सूर्याला गिळले. ते बघून इंद्रासहित सर्व देवांना काळजी वाटू लागली. सूर्याला व पृथ्वीला वाचविण्यासाठी इंद्राने आपले वज्र हे हनुमानांच्या दिशेने फेकले. त्या प्रहाराने हनुमानांचे तोंड वाकडे झाले व ते बेशुद्ध पडले. नंतर देवांनी त्यांना भीतीपायी 'तुला आपल्या सर्व शक्तींचा विसर पडेल' असा शाप दिला.

पुढे श्रीराम वनवासात असताना त्यांची व हनुमानाची भेट झाली. रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा हनुमानाने उड्डाण करून लंका गाठली आणि श्रीरामांचा निरोप माता सीतेला पोचवला. याच वेळ जम्बुवन्ताने आठवण करून दिल्याने त्यांना त्यांच्या महापराक्रमी शक्तीची जाणीव झाली. ते वर्ष इ.स.पू. ५०६७ होते असे दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च येथील संशोधकांचे म्हणणे आहे.[ संदर्भ हवा ]

लंकाधिपती रावणाच्या सैनिकांनी मारुतीला पकडून रावणासमोर उभे केले व त्याच्या शेपटीला कापड्याच्या चिंध्या बांधून त्यांना आग लावली. तेव्हा त्याने घरांघरांवर उड्या मारत आपल्या जळत्या शेपटीने पूर्ण लंकेला आग लावली. त्याने लंका सोडली. परत जाऊन त्याने सीतेचे वर्तमान रामास कळवले. रामाने आपली वानरसेना लंकेला नेली आणि रावणाशी युद्ध केले. या युद्धात हनुमानाने रामाला मोठी मदत केली. जेव्हा लक्ष्मण बाण लागून बेशुद्ध पडला होता, तेव्हा त्याच्या उपचारांसाठी हनुमानाने उत्तराखंडातील द्रोणागिरी पर्वताकडे झेप घॆतली. पर्वतावर त्याला हवी ती वनस्पती ओळखू न आल्याने त्याने सर्व द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. त्या पर्वतावर आढळणाऱ्या संजीवनी नावाच्या वनौषधीने लक्ष्मण परत शुद्धीवर आला व त्याचे प्राण वाचले.

हनुमान हा सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव आहे, म्हणजे तो अजूनही जिवंत आहे, अशी मान्यता आहे. जगात ज्या ज्या ठिकाणी, जेव्हा जेव्हा रामाचे नाव घेतले जाते, तेथे मारुती हजर असतो, असे म्हणतात. या माहितीच्या आधाराने कवी तुलसीदासाने मारुतीला शोधून काढले. मारुतीचा उल्लेख महाभारतातदेखील येतो. तो महाभारताच्या युद्धात अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर विराजमान होता.

हनुमान जन्मभूमी ही अंजनेरी पर्वतावर त्र्यंबकेश्वर नाशिक हीच आहे. भगवान हनुमानाची आई अंजनी यांच्या नावावरून हे नाव पडले आहे. हनुमान जन्मस्थानाबाबत भौगोलिक पुरावे अंजनेरी पर्वतावर आजही उपलब्ध आहेत. त्र्यंबकेश्वर महात्म्य, नवनाथ भक्तिसार, गौतमी महात्म्य या पवित्र हिंदू धर्मग्रंथांमध्ये हनुमान जन्मस्थान हे अंजनेरी पर्वतच असल्याचे सिद्ध झालेले आहे. प्रसिद्ध मराठी संत-कवी एकनाथ यांच्या भावार्थ रामायणात असे म्हणले आहे.

जन्मतिथी

हनुमानाच्या जन्मतिथीबद्दल आणि जन्मस्थानाबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात हनुमान जयंती वेगवेगळ्या तारखेला साजरी होते. तामिळनाडूत आणि केरळात ती मार्गशीर्षात, तर ओरिसामध्ये वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी होते.

  • चैत्र पौर्णिमेला मारुतीचा जन्म झाला असे महाराष्ट्रात मानले जाते, त्यामुळे त्यादिवशी त्या राज्यात हनुमान जयंती असते.
  • हनुमानाचा जन्म नरक चतुर्दशीच्या दिवशी झाला असे उत्तर भारतात समजले जाते. या दिवशी महाराष्ट्रात आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि उत्तर भारतात कार्तिक कृष्ण चतुर्दशी असते.
  • वाल्मिकी ऋषींच्या रामायणानुसार, हनुमानाचा जन्म कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला मंगळवारी झाला. चैत्र महिन्यातील तिथी विजय महोत्सव आणि कार्तिक महिन्यातील तिथी वाढदिवसाच्या रूपात साजरी केली जाते, असे म्हणले जाते.
  • भारतातील दाक्षिणात्य ग्रंथांमध्ये हनुमानाला सुवर्चला नावाची पत्नी होती. ती सूर्यदेवाची कन्या होती. हनुमानाचे हे लग्न ज्येष्ठ शुद्ध दशमीला झाले.

पत्नी व संतान

रामायण आणि बहुतेक पुराणांमध्ये हनुमान हे ब्रह्मचारी असल्याचे वर्णन केले गेले असले तरी, दक्षिण भारतात हनुमानाने सूर्य देवाची कन्या सुवर्चला हिच्याशी विवाह केला होता असे मानले जाते. या विवाहानंतर देखील हनुमान आणि सुवर्चला यांनी ब्रह्मचर्याचे पूर्ण पालन केले होते.[2] तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात हनुमान आणि त्यांची पत्नी सुवर्चला यांचे मंदिर असून यांची येथे नित्य पूजा केली जाते. जेष्ठ शुद्ध दशमीला स्थानिक लोक हनुमानजींचा विवाह देखील साजरा करतात.[3]

सीतेच्या शोधार्थ हनुमान लंकेला जाण्यासाठी समुद्रावरून उडत असताना, त्यांच्या घामाचा एक थेंब मगरीच्या तोंडात पडला, ज्यापासून ती मगर गर्भार राहिली. रावणाचा एक भाऊ अहिरावण मकरध्वज नावाने त्याचे पालनपोषण केले आणि त्याला स्वतःच्या पाताळ लोकाच्या वेशीवर रक्षक म्हणून नेमले. लांकेतील युद्धात एके दिवशी, अहिरावणाने राम आणि लक्ष्मण यांना पळवून नेले आणि पाताळ लोकात बंदिस्त केले. याठिकाणी हनुमान आणि मकरध्वजात युद्ध झाले. यात मकरध्वज पराभूत झाला. हनुमानाने अहिरावण आणि महिरावण यांना मारून आपल्या या मुलाला पाताळ लोकाचा राजा बनवले.

झोपलेल्या हनुमानाच्या मूर्ती

भारतात अशा आठ मूर्ती आहेत : १. भद्रा मारुती (खुलताबाद येथील घृष्णेश्वराच्या जवळ). २, अलाहाबादेत यमुनेच्या तीरावर (संगम घाटावर) ३, मध्य प्रदेशात जाम सावली येथे ४. राजस्थानमध्ये अलवर येथे ५. राजकोट ६. इटावा जिल्ह्यात पिलुआ गावात ७. चांदोली जिल्ह्यात आणि ८. छिंदवाडा येथे.

हे सुद्धा पहा

संदर्भ

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.