सिमी गरेवाल (जन्म सिम्रीता गरेवाल; [1] १७ ऑक्टोबर १९४७) एक भारतीय अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता आणि टॉक शो होस्ट आहेत. त्यांना दोन फिल्मफेअर पुरस्कार आणि एक भारतीय दूरचित्रवाणी अकादमी पुरस्कार यासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कट्टर राजकीय समर्थक आहे आणि सोशल मीडियावर त्याबद्दल खूप सक्रीय आहेत.

Simi Garewal (es); Simi Garewal (hu); સિમી ગરેવાલ (gu); سیمی گریوال (ks); Simi Garewal (ast); Сими Гаревал (ru); सिमी गरेवाल (mai); Simi Garewal (sq); سیمی گریوال (fa); Simi Garewal (da); सिमी गरेवाल (ne); سیمی گریوال (ur); Simi Garewal (tet); Simi Garewal (mg); Simi Garewal (sv); Simi Garewal (ace); सिमी गरेवाल (hi); సిమి గరేవాల్ (te); ਸਿਮੀ ਗਰੇਵਾਲ (pa); Simi Garewal (map-bms); சிமி கரேவால் (ta); सिमी ग्रेवाल (bho); সিমি গারেওয়াল (bn); Simi Garewal (fr); Simi Garewal (jv); Simi Garewal (de); Simi Garewal (su); Simi Garewal (ga); Simi Garewal (fi); सिमी गरेवाल (mr); Simi Garewal (bug); ସିମୀ ଗରେୱାଲ (or); Simi Garewal (pt); Simi Garewal (ms); Simi Garewal (bjn); سيمى جاروال (arz); Simi Garewal (sl); Simi Garewal (ca); Simi Garewal (pt-br); Simi Garewal (nb); Simi Garewal (id); Simi Garewal (nn); സിമി ഗരേവാൾ (ml); Simi Garewal (nl); Simi Garewal (min); Simi Garewal (gor); ಸಿಮಿ ಗೆರೆವಾಲ್ (kn); Simi Garewal (it); Simi Garewal (en); سيمي جاروال (ar); シミ・ガレワル (ja); Simi Garewal (uz) actriz india (es); ભારતીય અભિનેત્રી (gu); aktore indiarra (eu); ہِندوستٲنؠ فِلِمی اَداکارہ (ks); actriz india (ast); actriu índia (ca); cyfarwyddwr ffilm, cynhyrchydd a sgriptiwr ffilm a aned yn Delhi yn 1947 (cy); ban-aisteoir Indiach (ga); مجری تلویزیونی، بازیگر، و کارگردان هندی (fa); 印度女演員 (zh); indisk skuespiller (da); actriță indiană (ro); بھارتی اداکارہ (ur); indisk skådespelare (sv); індійська акторка (uk); भारतीय अभिनेत्रि (hi); intialainen näyttelijä (fi); Indian actress (en-ca); இந்திய நடிகை (ta); attrice regista e conduttrice televisiva indiana (it); ভারতীয় অভিনেত্রী (bn); actrice indienne (fr); India näitleja (et); އިންޑިއާއަށް އުފަން އެކްޓްރެސެއް (dv); Indian actress (en); actriz indiana (pt); שחקנית הודית (he); pemeran asal India (id); indisk skodespelar (nn); ഇന്ത്യന്‍ ചലചിത്ര അഭിനേത്രി (ml); Indiaas actrice (nl); Indian actress (en-gb); индийская актриса (ru); Indian actress (en); ଭାରତୀୟ ଅଭିନେତ୍ରୀ (or); actriz india (gl); ممثلة هندية (ar); indische Filmschauspielerin und Fernsehmoderatorin (de); भारतीय अभिनेत्री (bho) Garewal (de); ସିମି ଗରେୱାଲ (or)
जलद तथ्य जन्म तारीख, कार्य कालावधी (प्रारंभ) ...
सिमी गरेवाल 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखऑक्टोबर १७, इ.स. १९४७
दिल्ली
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९६२
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • Newland House School
उल्लेखनीय कार्य
पुरस्कार
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
बंद करा

त्यांनादो बदन (१९६६), साथी (१९६८), मेरा नाम जोकर (१९७०), सिद्धार्थ (१९७२), कर्ज (१९८०) यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी ओळखले जाते. सत्यजित राय दिग्दर्शित अरण्यार दिन रात्रि या बंगाली चित्रपटात त्यांनी काम केले. त्या त्यांच्या सेलिब्रिटी टॉक शो, रेन्डेवू विथ सिमी गरेवाल यासाठी देखील ओळखल्या जातात.

प्रारंभिक जीवन

गरेवाल यांचा जन्म लुधियाना येथे झाला.[2] [3] त्यांचे वडील, ब्रिगेडियर जे.एस. गरेवाल यांनी भारतीय सैन्यात सेवा बजावली. सिमी ही चित्रपट निर्माते यश चोप्रा यांची पत्नी पामेला चोप्राची चुलत बहीण आहे. सिमी यांची आई दर्शी आणि पामेलाचे वडील मोहिंदर सिंग हे भावंडे होते. सिमी इंग्लंडमध्ये वाढली आणि तिची बहीण अमृतासोबत न्यूलँड हाऊस स्कूलमध्ये शिकली.[4]

चित्रपट आणि दूरदर्शन कारकीर्द

गरेवालयांचे बालपण इंग्लंडमध्ये घालवल्यानंतर, गरेवाल किशोरवयातच भारतात परतल्या. इंग्रजी भाषेतील त्यांच्या अस्खलिततेने टार्झन गोज टू इंडिया या इंग्रजी भाषेतील चित्रपटाच्या निर्मात्यांना त्यांना भूमिका देण्यास प्रवृत्त केले. १९६२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातून गरेवाल यांनी फिरोज खानसोबत पदार्पण केले.[5] त्यांचा अभिनय चांगला होता आणि त्यांना आणखी अनेक चित्रपटांच्या मागण्या आल्या. १९६० आणि ७० च्या दशकात, त्यांनी अनेक उल्लेखनीय भारतीय चित्रपटांमध्ये काम केले, जसे की मेहबूब खान दिग्दर्शित सन ऑफ इंडिया (१९६२), राज खोसला दिग्दर्शित दो बदन (१९६६), राज कपूर यांसारख्या प्रमुख दिग्दर्शकांसोबत मेरा नाम जोकर (१९७०), सत्यजित रे दिग्दर्शित अरण्यार दिन रात्री (१९७०, डेज अँड नाईट्स इन द फॉरेस्ट ) आणि मृणाल सेन दिग्दर्शित पडाटिक (१९७३). १९७२ मध्ये शशी कपूर सोबत हर्मान हेसच्या कादंबरीवर आधारित इंग्रजी भाषेचा चित्रपट सिद्धार्थ मध्ये त्यांनी काम केले होते. गरेवाल यांनी या चित्रपटात एक नग्न दृश्य देखील केले ज्यामुळे भारतात काही वाद निर्माण झाला आणि भारतीय सेन्सॉर बोर्डाने सांगितलेला भाग कापल्याने तो प्रदर्शित करण्यात आला.[6][7] [8] नंतर, १९७० च्या दशकाच्या मध्यात, त्यांनी त्यांच्या मेव्हणा यश चोप्रा यांनी बनवलेल्या कभी कभी' (१९७६) या लोकप्रिय चित्रपटात व चलते चलते (१९७६) मध्ये मुख्य भूमिका केली.[9] कर्ज (१९८०) मधील खलनायीका म्हणून त्यांनी साकारलेली आणखी एक उल्लेखनीय भूमिका होती. चार्ल्स ॲलन यांच्या पुस्तकावर आधारित बीबीसी डॉक्यु-ड्रामा महाराजास (१९८७) मध्ये त्यांनी काम केले.

१९८० च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांचे लक्ष लेखन आणि दिग्दर्शनाकडे वळले. त्यांनी सिगा आर्ट्स इंटरनॅशनल ही स्वतःची निर्मिती कंपनी स्थापन केली. त्यांनी दूरदर्शनसाठी इट्स अ वुमन्स वर्ल्ड (१९८३) या टीव्ही मालिकेचे आयोजन, निर्मिती आणि दिग्दर्शन केले. त्यांनी यूकेमधील चॅनल ४ साठी लिव्हिंग लिजेंड राज कपूर (१९८४) व राजीव गांधींवर इंडियाज राजीव नावाचा तीन भागांचा माहितीपट तयार केले. १९८८ मध्ये त्यांनी रुखसत हा हिंदी चित्रपट लिहिला ज्यासाठी ऑस्ट्रेलियातील पॅटर्स पुरस्कारातून प्रथम पारितोषिक मिळाले.

गरेवाल यांनी रेन्डेवू विथ सिमी गरेवाल या टॉक शो केला.[10]

त्या सहसा टीव्ही शो आणि पुरस्कार समारंभात पांढरे कपडे घालतात आणि "द लेडी इन व्हाईट" म्हणून प्रसिद्ध आहे.[11]

त्या स्टार प्लसवरील इंडियाज मोस्ट डिझायरेबल या टॉक शोसह दूरचित्रवाणीवर परतल्या ज्यामध्ये त्यांनी अविवाहित पात्र बॉलीवूड कलाकार, व्यवसायीक, मीडिया आयकॉन्स आणि भारतीय क्रिकेट खेळाडू त्यांच्या "आदर्श आणि प्रिय व्यक्ती" बद्दलच्या मुलाखती घेतल्या. [12]

वैयक्तिक जीवन

वयाच्या १७ व्या वर्षी गेरेवाल यांचे पहिले गंभीर प्रेमसंबंध होते, जामनगरचे महाराज दिग्विजयसिंहजी रणजितसिंहजी जडेजा यांच्याशी, जे त्यांचे इंग्लंडमधील शेजारीही होते.[13][14][15] गरेवाल या पतौडीचे नवाब मन्सूर अली खान पतौडी यांच्याशी नातेसंबंधात होते, परंतु शर्मिला टागोर यांना भेटल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी संबंध तोडले.[16][17]

१९७० मध्ये, त्यांनी दिल्लीतील कुलीन चुन्नमल कुटुंबातील रवी मोहन यांच्याशी विवाह केला. १९७९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.[15]

फिल्मोग्राफी

अधिक माहिती वर्ष, चित्रपट ...
वर्ष चित्रपट भूमिका नोट्स
१९६२ राझ की बात कमल
सन ऑफ इंडिया ललिता
टारझन गोज टू इंडिया राजकुमारी कामारा
१९६५ तीन देवियाँ सिमी / राधा राणी
जोहर-मेहमूद इन होवा सिम्मी
१९६६ दो बदन डॉ. अंजली सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार
१९६८ आदमी आरती
साथी रजनी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार
एक रात रेखा शर्मा
१९७० मेरा नाम जोकर मेरी
अरण्यार दिन रात्री दुली बंगाली चित्रपट
१९७१ अंदाज मोना
दो बुंद पानी गौरी
सीमा
१९७२ अनोखी पेहचान
सिद्धार्थ कमला
१९७३ पडाटिक कार्यकर्त्याला आश्रय देणारी स्त्री बंगाली चित्रपट
नमक हराम मनिषा
१९७४ हात की सफाई रोमा एस कुमार
१९७५ डाक बांगला सिमी नितीन सेठी आणि इतर
१९७६ नाच उठे संसार सोमू
चलते चलते गीता
कभी कभी शोभा कपूर
१९७७ अभि तो जी ले मिस महाजन
१९७९ अहसास आशा चौधरी
१९८० द बर्निंग ट्रेन शाळेतील शिक्षक
कर्झ कामिनी वर्मा नामांकन - सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार
इन्साफ का तराजू वकील
१९८१ नसीब स्वतः पाहुण्या कलाकार
प्रोफेसर प्यारेलाल रिटा
बिवी-ओ-बिवी निशा
१९८२ तेरी मेरी कहानी मीना शास्त्री/सीमा
हथकडी पम्मी मित्तल
१९८६ लव्ह अँड गॉड गझाला
१९८८ रुखसत राधा तलवार चित्रपट दिग्दर्शक देखील
बंद करा

दूरदर्शन

अधिक माहिती वर्ष, नाव दाखवा ...
वर्ष नाव दाखवा भूमिका नोट्स
१९८५ लिव्हिंग लिजंड राज कपूर लेखक/दिग्दर्शक चॅनल फोर दूरचित्रवाणी, यूकेसाठी राज कपूरवरील माहितीपट
१९९१ इंडियाज राजीव लेखक/दिग्दर्शक राजीव गांधींवर तीन भागांची माहितीपट मालिका
१९९७ रेन्डेवू विथ सिमी गरेवाल यजमान स्टार वर्ल्ड इंडियावर ५ सीझन (१४० भाग).
२०११ सिमी सिलेक्टस इंडियाज मोस्ट डिझायरेबल यजमान स्टार वर्ल्ड इंडियावर १ सीझन (२२ भाग).
बंद करा

पुरस्कार आणि नामांकन

  • १९६६ - सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार - दो बदन
  • १९६८ - सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार - साथी
  • १९८० - नामांकन - सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर पुरस्कार - कर्ज
  • १९९९ - सर्वोत्कृष्ट टॉक शो आणि सर्वोत्कृष्ट अँकरसाठी स्क्रीन पुरस्कार
  • २००१ - सर्वोत्कृष्ट अँकर आणि टॉक शोसाठी RAPA पुरस्कार
  • २००३ - सर्वोत्कृष्ट अँकरसाठी इंडियन दूरचित्रवाणी अकादमी पुरस्कार
  • २००३ - मीडिया आणि दूरचित्रवाणीमधील व्यावसायिक उत्कृष्टतेसाठी रोटरी पुरस्कार
  • २००४ - सर्वोत्कृष्ट टॉक शोसाठी इंडियन फिल्मगोअर्स असोसिएशन पुरस्कार

संदर्भ

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.