From Wikipedia, the free encyclopedia
सांडपाणी म्हणजे अशुद्ध, वापरलेले पाणी. सांडपाणी घरांतून, उद्योगातून बाहेर पडते व हे पाणी पिण्यास अयोग्य असते.घराभोवती, रस्त्यात आणि गटारीत तुंबलेले सांडपाणी आरोग्यास घातक असते. तसेच त्याचा घाण वास येतो, रस्त्यावर त्या पाण्याने चिकचिक होऊन घसरडे होते आणि डासांना अंडी घालायला जागा मिळते. हे डास चावल्याने लोकांना मलेरियासारखे रोग होतात. अशा सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी जमिनीत सांडपाणी जिरण्यासाठी परसबाग किंवा शोषखड्डा करता येतो. पाणी वापरताना त्या अनेक गोष्टी मिसळल्या जातात आणि ते पाणी अशुद्ध होते. हे पाणी जसेच्या तसे परत वापरता येत नाही. अशा अशुद्ध पाण्याला सांडपाणी म्हणतात. सांडपाणी हे शौचालय, न्हाणीघर, स्वयंपाकघर, धुणी-भांडी, कारखाने इ. ठिकाणी होणाऱ्या पाण्याच्या वापरातून निर्माण होते. सांडपाण्याची नीट विल्हेवाट लावण्याची गरज असते; ते न केल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. या पाण्याचा पर्यावरणावर देखील विपरित परिणाम होतो.पाणी आडवा पाणी जिरवा
सांडपाणी व्यवस्थापन म्हणजे शौचालयातून, घरगुती वापरातून व कारखान्यातून निर्माण होणारे सांडपाणी सुरक्षितरित्या एकत्रित करून, त्याची साठवण केल्यावर त्यावर प्रक्रिया करून त्याची नीट विल्हेवाट लावणे. सांडपाण्याचे व्यवस्थापन केल्यावर त्याचा पुनर्वापर करता येतो आणि नागरिकांचे आरोग्यही सुधारते. त्याबरोबरच परिसरातल्या नद्या, नाले व तलाव यांचे संरक्षण होते, तिथला निसर्ग अबाधित राहतो. सांडपाण्यावर प्रक्रिया करणे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि शहरीकरणामुळे ही गरज कायमच अपुरी पडत असते. या अपुऱ्याल सोयींमुळे विकसनशील देशांत अंदाजे १८ लाख लोकांचा अतिसारामुळे दर वर्षी मृत्यू होतो १ , पैकी ९०% ५ वर्षाच्या आतली मुले असतात. सर्व प्रकारच्या सांडपाण्याचे एकत्रीकरण टाळणे
==सांडपाणी नियोजन== सांस्कृतिक भागामध्ये महत्त्वाचे असते
घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ज्या प्रक्रियांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो त्यामध्ये ऍक्टिवेटेड स्लज ऍण्ड ट्रिकलिंग फिल्टर पद्धत, ऑक्सिडेशन/वेस्ट स्टॅबिलाझेशन पॉण्ड्स, एरेटेड लॅगून्स आणि विविध अनऍरोबिक प्रक्रिया पद्धतींचा समावेश आहे.
या सर्व पद्धतींपासून प्रेरित होऊन आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या विविध शाखांद्वारा मिळालेल्या नवनव्या माहितीचा आधार घेऊन घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी “जलसंवर्धन” ही संकल्पना तयार आणि प्रमाणित करण्यात आली आहे.
http://hindi.indiawaterportal.org/node/55728 Archived 2018-05-05 at the Wayback Machine.
http://www.marathiworld.com/sanskruti-m/waste-water-planning
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.