![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/1/1e/RanthamboreLandscape_01.jpg/640px-RanthamboreLandscape_01.jpg&w=640&q=50)
रणथंभोर राष्ट्रीय उद्यान
उत्तर भारतातील अभयारण्य / From Wikipedia, the free encyclopedia
रणथंभोर राष्ट्रीय उद्यान हा भारतातील एक प्रमुख व्याघ्रप्रकल्प आहे. अत्यंत कमी वनक्षेत्रातील वाघांची जास्त संख्या हे या प्रकल्पाचे वैशिट्य होते. परंतु याच कारणाने हे वनक्षेत्र चोरट्या शिकारींसाठी पण नंदनवन बनले. रणथंभोर व्याघ्रप्रकल्प हा राजस्थानमधील सवाई माधोपूर या जिल्ह्यात आहे व जयपूरपासून साधारणपणे १३० किमी अंतरावर आहे.
रणथंभोर राष्ट्रीय उद्यान | |
---|---|
आययुसीएन वर्ग २ (राष्ट्रीय उद्यान) | |
![]() रणथंभोरचे राष्ट्रीय उद्यान व किल्ला | |
ठिकाण | सवाई माधोपूर, राजस्थान, भारत |
जवळचे शहर | सवाई माधोपूर (११ किमी) |
गुणक | 26°01′02″N 76°30′09″E |
क्षेत्रफळ | ३९२ चौरस किलोमीटर |
स्थापना | १९८० |
नियामक मंडळ | भारत सरकार, वन आणि पर्यावरण मंत्रालय |
संकेतस्थळ |
www |
या उद्यानात उत्तरेकडे बनास नदी वाहते तर दक्षिणेकडे चंबळ नदी वाहते. उद्यानात अनेक तळी आहेत. तेथे वन्यप्राणी हमखास पहायला मिळतात. उद्यानाच्या मध्यभागीच प्रसिद्ध रणथंबोरचा किल्ला आहे त्यावरून या उद्यानाचे नाव पडले आहे. गेली कित्येक शतके ह्या किल्यात वस्ती नसल्याने हा भकास झाला आहे. या किल्यातच काही वाघांनी आपले घर थाटले होते. या विषयावर वाल्मीक थापर यांनी अतिशय सुरेख चित्रण करून एक माहितीपट बनवला आहे. या अभयारण्यात इतर प्रमुख प्राण्यांमध्ये बिबटे, रानडुक्कर, सांबर, चितळ, गवा व नीलगाय यांचाही समावेश होतो.