From Wikipedia, the free encyclopedia
मुरलीकांत पेटकर हे भारताचे पहिले पॅरालंपिक सुवर्णपदक विजेते आहेत.जर्मनीतील हेडलबर्ग येथे ऑगस्ट १९७२ च्या ग्रीष्म पॅराऑलिम्पिकमधील त्यांनी वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले.[1] त्यांनी ५० मीटर फ्रीस्टाईल जलतरण स्पर्धेत ३७.३३ सेकंदात विश्वविक्रम प्रस्थापित केला.[2] त्याच खेळांमध्ये त्याने भाला, अचूक भालाफेक आणि ॲथलेटिक्समध्ये भाग घेतला. तिन्ही स्पर्धांमध्ये ते अंतिम स्पर्धक म्हणून होते. २०१८ मध्ये, त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[3][4]
कालांतराने पुणे येथील टाटा मोटर्स मध्ये त्यांना नोकरीत देखील सामावून घेण्यात आले.[5]
मुरलीकांत पेटकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील सांगलीच्या पेठ-इस्लामपूर भागात झाला. पेटकरांनी शालेय जीवनातच कुस्ती, हॉकी ,हॉकी आणि मैदानी खेळात चमक दाखवून आपले खेळाविषयीचे प्रेम निदर्शनास आणले होते.पुणे येथे भारतीय सैन्यदलातील मुलांच्या तुकडीत प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी एक उत्कृष्ट खेळाडू अशी स्वतःची ओळख निर्माण केली.प्रत्येक खेळात प्राविण्य मिळवले.
१९६४ साली जपानमधील तोक्यो येथे होणाऱ्या इंटरनॅशनल सर्व्हिसेस स्पोर्ट्स मीटमध्ये भारतीय सैन्यदलातर्फे मुष्टियुद्ध या खेळाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली.
१९६५च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धाच्या वेळी ते गंभीरपणे जखमी झाले होते.[6]
मुरलीकांत पेटकर यांच्या क्रीडाक्षेत्रातील कारकिर्दीत यांनी अनेकविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजय मिळवून भारताला बहुमान प्राप्त करून दिला आहे. इंग्लंड येथे झालेल्या स्टोक मंन्डेविले आंतरराष्ट्रीय पॅराप्लेजीक स्पर्धेमध्ये स्वतःचेच विक्रम मोडला.[7] सलग ५ वर्षे (१९६९-७३) सर्वसाधारण अजिंक्यपद मिळवण्याचे सातत्य, स्कॉटलंडमधील एडिनबरा येथे झालेल्या तिसऱ्या कॉमनवेल्थ पॅराप्लेजीक स्पर्धेमध्ये ५० मी. फ्रीस्टाईल पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक, भालाफेकीत रौप्य आणि गोळाफेकीत कांस्य; तसेच १९८२ साली हॉंगकॉंग येथे आंतरराष्ट्रीय FESPIC क्रीडास्पर्धेत त्यांनी ५० मी. जलतरण स्पर्धेत केलेला एक नवीन विश्वविक्रम.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.