![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/95/Capricornus_IAU.svg/langmr-640px-Capricornus_IAU.svg.png&w=640&q=50)
मकर (तारकासमूह)
From Wikipedia, the free encyclopedia
मकर हे आधुनिक ८८ तारकासमूहातील एक तारकासमूह आहे. दुसऱ्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी यांनी बनवलेल्या ४८ तारकासमूहांच्या यादीमध्ये ह्या तारकासमूहाचे नाव होते. ‘मकर’ला इंग्रजीमध्ये Capricornus (कॅप्रिकॉर्नस) म्हणतात. या शब्दाचा लॅटिन भाषेतील अर्थ शिंग असलेली शेळी किंवा शेळीची शिंगे असा होतो. याचे चिन्ह पुढीलप्रमाणे आहे (युनिकोड ♑). याला माशाचे शेपूट असलेल्या बोकडाच्या रूपामध्ये दर्शवले जाते. पॅन देवतेचे माशाचे शेपूट असलेल्या बोकडात रूपांतर होऊन या तारकासमूहाची आकृती बनली आहे, अशी पौराणिक समजूत आहे.[2]
तारकासमूह | |
![]() मकर मधील ताऱ्यांची नावे | |
लघुरुप | Cap |
---|---|
प्रतीक | शेळी |
विषुवांश |
२०h ०६m ४६.४८७१s– २१h ५९m ०४.८६९३s[1] |
क्रांती |
−८.४०४३९९९°– −२७.६९१४१४४°[1] |
क्षेत्रफळ | ४१४ चौ. अंश. (४०वा) |
मुख्य तारे | २३ |
बायर/फ्लॅमस्टीड तारे | ४९ |
ग्रह असणारे तारे | ५ |
३.००m पेक्षा तेजस्वी तारे | १ |
१०.०० pc (३२.६२ ly) च्या आतील तारे | ३ |
सर्वात तेजस्वी तारा | δ Cap (देनेब अलजीदी) (२.८५m) |
सर्वात जवळील तारा |
एलपी ८१६-६० (१७.९१ ly, ५.४९ pc) |
मेसिए वस्तू | १ |
उल्का वर्षाव |
अल्फा कॅप्रिकॉर्निड्स काय कॅप्रिकॉर्निड्स सिग्मा कॅप्रिकॉर्निड्स टाऊ कॅप्रिकॉर्निड्स कॅप्रिकॉर्निडेन-सॅजिटॅरिड्स |
शेजारील तारकासमूह |
कुंभ गरूड धनू सूक्ष्मदर्शी दक्षिण मस्त्य |
+६०° आणि −९०° या अक्षांशामध्ये दिसतो. सप्टेंबर महिन्यात रात्री ९:०० वाजता सर्वोत्तम दिसतो. |
मकर क्रांतिवृत्तावर आहे. मकर तारकासमूहाची सीमा गरुड, धनु, सूक्ष्मदर्शी, दक्षिण मस्त्य, आणि कुंभ या इतर तारकासमूहांना लागून आहे. याचा १० बाजूंचा बहुभुजाकृती आकार विषुवांश २० ता ०६ मि ते २२ ता आणि क्रांति -१०° ते -२०° या मर्यादेत येतो. याचे खगोलावरील क्षेत्रफळ ४१४ चौरस अंश आहे. हा क्रांतिवृत्तावरील सर्वात लहान तारकासमूह आहे. हा तारकासमूह सप्टेंबरच्या उत्तरार्धात रात्री ९ च्या सुमारास मध्यमंडलावर येतो.