![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/a/af/Brahman_%2528Bos_indicus%2529.jpg/640px-Brahman_%2528Bos_indicus%2529.jpg&w=640&q=50)
ब्राह्मण गाय
From Wikipedia, the free encyclopedia
ब्राह्मण गाय हा एक अमेरिकन पशु-गोवंश असून याची निर्मिती विविध भारतीय गोवंशापासून झालेली आहे.[1]
जलद तथ्य मूळ देश, आढळस्थान ...
![]() अमेरिकेतील ब्राह्मण गोवंश | |
![]() | |
मूळ देश | अमेरिका |
---|---|
आढळस्थान | अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया |
मानक | FAO |
उपयोग | मांसाहार |
वैशिष्ट्य | |
वजन | |
आयुर्मान | १८ ते २० वर्षे |
|
बंद करा
या गाईच्या निर्मितीसाठी अंदाजे २६६ विविध वळू आणि २२ गाईंचा वापर करण्यात आला. यात गीर, ओंगल, कृष्णातिरी, कांकरेज, हरियाना आदी भारतीय वंश वापरण्यात आले. तसेच भारतीय गाईपासून निर्मित ब्राझील मधील गुझेरात आणि नेल्लूर नावाचे संकरित वंश सुद्धा वापरल्या गेले. परिणाम स्वरूप एक अत्यंत काटक, विविध प्रतिकूल परिस्थितीत टिकणारी, जाड त्वचा असलेली उंचपुरी प्रजाती निर्माण झाली.[2] या प्रजातीचा मुख्य उपयोग मांसाहारासाठी करण्यात येतो.[3][4]
तसेच ही गाय अमेरिकेतून अर्जेटीना, ब्राझील, ओमान सहित अनेक देशात निर्यात केली जाते. ब्राह्मण गायिपासून नंतर बीफ मास्टर, सांता गरडरीयस, ब्रँगस, ब्रैँफोर्ड सहित अनेक नवीन परदेशी गोवंश निर्माण केल्या गेले.. [3]