बर्लिन टेगल विमानतळ
बर्लिन, जर्मनी चे अंतरराष्ट्रीय विमानतळ / From Wikipedia, the free encyclopedia
बर्लिन टेगल विमानतळ (जर्मन: Flughafen Berlin-Tegel) (आहसंवि: TXL, आप्रविको: EDDT) हा जर्मनी देशाच्या बर्लिन शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. भूतपूर्व पश्चिम बर्लिन भागात स्थित असलेला हा विमानतळ जर्मनीमधील चौथ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.
जलद तथ्य बर्लिन टेगल विमानतळ Flughafen Berlin-Tegel (जर्मन), माहिती ...
बर्लिन टेगल विमानतळ Flughafen Berlin-Tegel (जर्मन) | |||
---|---|---|---|
आहसंवि: TXL – आप्रविको: EDDT
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
कोण्या शहरास सेवा | बर्लिन | ||
हब | एर बर्लिन युरोविंग्ज | ||
समुद्रसपाटीपासून उंची | १२२ फू / ३७ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 52°33′35″N 13°17′16″E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
08L/26R | ३,०२३ | डांबरी | |
08R/26L | २,४२८ | डांबरी | |
सांख्यिकी (२०१५) | |||
प्रवासी | २,१०,०५,१९६ | ||
विमाने | १,७८,५३८ | ||
स्रोत: [1] |
बंद करा
१९व्या शतकातील प्रसिद्ध जर्मन संशोधक ऑट्टो लिलियेन्थाल ह्याचे नाव देण्यात आलेला हा विमानतळ आपल्या षटकोनी आकाराच्या इमारतीसाठी प्रसिद्ध आहे. येथे एर बर्लिन आणि युरोविंग्जची ठाणी असून लुफ्तांसाचाही मोठा तळ आहे.
बर्लिन महानगरासाठी नवीन बर्लिन ब्रांडेनबुर्ग विमानतळ बांधण्यात येत आहे. तो वापरात आल्यानंतर टेगल विमानतळ बंद केला जाईल.