![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/3/37/The_Third_battle_of_Panipat_13_January_1761.jpg/640px-The_Third_battle_of_Panipat_13_January_1761.jpg&w=640&q=50)
पानिपतची तिसरी लढाई
ऐतिहासिक मराठा विरुद्ध अफगाण युद्ध / From Wikipedia, the free encyclopedia
पानिपतची तिसरी लढाई जानेवारी १४ १७६१ रोजी भारतातील हरियाणा राज्यातील पानिपत जवळ झाली. याच गावाजवळ पहिली दोन युद्धे झाली होती, ज्यात मुघलांची सरशी झाली होती व भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला होता. तिसरी लढाई अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील मराठ्यांत झाली. अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली. जरी महाराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतले.
![]() |
हा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.
|
आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
विकिस्रोतावर काय चालेल ?
प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
- ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.
- ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.
- ऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.
![पानिपतची तिसरी लढाई - १८ व्या शतकात फैजाबाद शैलीने काढलेले पानिपतच्या युद्धाचे वर्णन. यात दोन्ही सैन्याची व्यूहरचना दिसते आहे. तोफांचा धुरळा सर्वत्र उडलेला दिसतो. तपकीरी घोड्यावर अब्दाली आहे. खालच्या बाजूला नजीबची कमान दर्शावली आहे. मराठ्यांच्या गोटात जखमी भाऊला व विस्कळीत मराठ्यांची कमान दर्शावली आहे. व डाव्या बाजूच्या कोपऱ्यात बुणग्यांच्या शिबिरात घुसून महिलांवर अत्याचार करणारे अब्दालीचे सैनिक दाखवले आहेत.](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/3/37/The_Third_battle_of_Panipat_13_January_1761.jpg/640px-The_Third_battle_of_Panipat_13_January_1761.jpg)
पानिपतची तिसरी लढाई - १८ व्या शतकात फैजाबाद शैलीने काढलेले पानिपतच्या युद्धाचे वर्णन. यात दोन्ही सैन्याची व्यूहरचना दिसते आहे. तोफांचा धुरळा सर्वत्र उडलेला दिसतो. तपकीरी घोड्यावर अब्दाली आहे. खालच्या बाजूला नजीबची कमान दर्शावली आहे. मराठ्यांच्या गोटात जखमी भाऊला व विस्कळीत मराठ्यांची कमान दर्शावली आहे. व डाव्या बाजूच्या कोपऱ्यात बुणग्यांच्या शिबिरात घुसून महिलांवर अत्याचार करणारे अब्दालीचे सैनिक दाखवले आहेत.
दिनांक | १४ जानेवारी १७६१ |
---|---|
स्थान | पानिपत, हरियाणा, भारत 29.39°N 76.97°E / 29.39; 76.97 |
परिणती | दुराणींचा विजय परंतु प्रचंड नुकसान |
युद्धमान पक्ष | |
---|---|
![]() |
![]() ![]() ![]() |
सेनापती | |
सदाशिवराव भाऊ (मराठा सैन्याचे सरसेनापती) >विश्वासराव पेशवे दमाजीराव गायकवाड मल्हारराव होळकर जनकोजी शिंदे मल्हारराव होळकर महादजी शिंदे तुकाजी शिंदे राणोजी भोईटे रंभाजी आरवंदेकर पुरंदरे विंचूरकर इब्राहिम खान गारदी सिधोजी घार्गे सोनाजी भापकर |
अहमदशाह अब्दाली(शहा-दुराणी साम्राज्य) नजीब उद दौला शुजा उद दौला तिमूरशाह दुराणी |
सैन्यबळ | |
४०,००० घोडदळ २०० तोफा १५,००० पायदळ सैनिक १५,००० पेंढारी २-३ लाख बुणगे (न लढणारे यात्रेकरू, स्त्रिया व मुले) |
४२,००० घोडदळ १२०-१३० तोफा ३८,००० पायदळ सैनिक १०,००० राखीव सैनिक १०,००० इतर |
बळी आणि नुकसान | |
लढाऊ सैन्य:१५,०००-२०,०००. नागरिक= ३०,०००-३५,०००. एकूण :४५,००० ते ५५,०००. | ३५,००० ते ४०,००० |