पाण्याच्या थेंबांच्या रूपात पर्जन्य From Wikipedia, the free encyclopedia
पाऊस ही एक हवामानविषयक घटना आहे, जी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील ढगांमधून पाण्याचे द्रव किंवा घन थेंबांच्या वर्षावमुळे उद्भवते. पाऊस पडला की जल प्राप्ती होते. पावसामुळे धरती हिरवीगार होते. सगळीकडे हिरवळ पसरते. नद्या, विहिरी तुडूंब भरतात.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
पाऊस पडणे ही एक नैसर्गिक घटना आहे.वातावरणातील ढगांमधील बाष्पाचे (वाफेचे) द्रवीभवन होऊन पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागतात. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने (संपृक्त saturated झाल्याने) पाऊस पडतो.
पृथ्वीवर दरवर्षी साधारण ५०५,००० घन किमी पाऊस पडतो, त्यातील ३९८,००० घन किमी पाऊस समुद्रावर पडतो. तरी, सर्वात जास्त पाऊस ठराविक प्रदेशांतच पडतो.पाऊस पडतो तिथे समृद्धता असते.पाऊस ह्या शब्दाचे अनेक समानार्थी शब्द आहेत .
१. अतिशय जास्त पाऊस ३०० ते ७५० सें.मी.
(किंवा त्याहून अधिक अपवादात्मक पर्जन्यमान)
२ जास्त पाऊस २०० ते ३०० सें.मी.
३ मध्यम पाऊस १०० ते २०० सें.मी.
४ कमी पाऊस ५० ते १०० सें.मी. ( किंवा अपवादात्मक कमी पर्जन्यमान.)
पाऊस (Rain), रिमझिम (किंवा झिमझिम) पाऊस (Drizzle), पर्जन्य (Rainfall), पावसाच्या धारा (किंवा सरी) (Rain Showers), मुसळधार पाऊस (Heavy Rain)/(Heavy Downpour)/(Torrential Rain), पावसाची रिपरिप/पिरपिर (Incessant Light Rain), संततधार/पावसाची झड (Incessant Heavy Rain, Downpour), नागडा पाऊस (Rain and Sunshine together), शिरवे/धावता पाऊस (Passing Showers), गारांचा पाऊस/गारपीट (Hailstorm), अतिवृष्टी (Excessive Rainfall), हिमवर्षा (Snowfall), हिमवर्षाव (Rain of Snow Flakes), बर्फमिश्रित पाण्याचा पाऊस (Sleet), हिमवादळ (Snow Storm), हलका पाऊस (Light Rain), तुरळक पाऊस (Isolated Rainfall,), विखुरलेला पाऊस (Scattered Rain), थांबून थांबून पडणारा पाऊस (Intermittent Rain), सार्वत्रिक पाऊस (Widespread Rain), गडगडाटी पाऊस/मेघगर्जनेसहित पाऊस (Thunder Showers), वादळी पाऊस/पावसाचे वादळ (Stormy Rain/Rain Storm), मोसमी पाऊस (Monsoon), नैर्ऋत्य मोसमी पाऊस (Southwest Monsoon Rain), ईशान्य मोसमी पाऊस/हस्ताचा पाऊस, (Northeast Monsoon, Post-Monsoon), उन्हाळी पाऊस (Summer Rain), हिवाळी पाऊस (Winter Rain), बारमाही पाऊस (Year Long Rain), अवकाळी (किंवा अवकाळ्या) पाऊस (Un-seasonal Rain), रात्रीचा पाऊस (Night Rain), धडकवणी/मृगाचा पाऊस/वळवाचा पाऊस/वळीव (Pre-Monsoon showers), हस्ताचा पाऊस/पर्जन्य ( heavy rainfall ) ,सरासरी पाऊस/पर्जन्यमान (Average Rainfall), वार्षिक पाऊस (Annual Rainfall), पर्जन्यछाया/पर्जन्य छायेचा प्रदेश (Rain Shadow), पावसाळी दिवस (Rainy Day), उत्तरेचा पाऊस (Northerly Rain); कृत्रिम पाऊस (Artificial Rain), ढग फवारणी/मेघारोपण (Cloud seeding)
अखंडपणे मुसळधार पाऊस पडणे यास 'झड लागणे' म्हणतात. याचा कालावधी तीन दिवस अथवा कधीकधी सात दिवसही असतो. अशा झडीचा शेतीला फायदा होतो पण क्वचित प्रमाणात नुकसानही होते.परिणामतः झड लागल्यावर ओला दुष्काळ पडतो.
१. मौसीनराम (सरासरी वार्षिक पाऊस ११,८७३ मिलीमीटर )
२. चेरापुंजी (सरासरी ११,७७७ मिमी.)
३. अगुंबे (सरासरी ७६४० मिमी)
४. आंबोली (७५०० मिमी
५. ताम्हिणी (सरासरी वार्षिक पाऊस ६४९८ मिलिमीटर )
इ.स. १९७६, १९७८, १९९०, १९९४, २००५, २००६, २०११, आणि २०१४ या वर्षी ताम्हिणी घाटात चेरापुंजीपेक्षा जास्त पाऊस पडला होता.
पावसावर लिहिला गेलेल्या काही मराठी कविता आणि गाणी पुढीलप्रमाणे आहेत.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.