![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/c0/Paresh_Rawal_still4.jpg/640px-Paresh_Rawal_still4.jpg&w=640&q=50)
परेश रावळ
भारतीय राजकारणी / From Wikipedia, the free encyclopedia
परेश रावळ (जन्म ३० मे १९५५) हे एक भारतीय अभिनेते, विनोदी अभिनेते, चित्रपट निर्माते आणि राजकारणी आहेत. त्यांनी विनोदी भूमिकांबतोबरच चरित्र कलावंतांच्याही भूमिका समर्थपणे केल्या आहेत. संजय दत्तच्या जीवनावर आधारित ‘संजू’ चित्रपटात सुनील दत्त यांची भूमिका त्यांनी साकारली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निर्माण होणाऱ्या चित्रपटात रावल हे मोदींचे पात्र साकारणार आहेत.
रावल हे सन २०१४ पासूनचे गुजरातमधील भाजपचे खासदार असून पंतप्रधान मोदींचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. इ.स. २०१४ मध्ये रावळ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.[2] ते २४० हून अधिक चित्रपटांमध्ये दिसला आहेत आणि त्याना विविध पुरस्कार मिळाले आहेत. १९९४ मध्ये, 'वो चोकरी' आणि 'सर' या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. नंतरच्यासाठी, त्याना नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी पहिला फिल्मफेर पुरस्कार मिळाला. यानंतर केतन मेहता यांच्या सरदार चित्रपटात त्यांनी स्वातंत्र्यसैनिक वल्लभभाई पटेल यांची प्रमुख भूमिका साकारली, या भूमिकेमुळे त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळाली.