नागपूर शहरातील जलद परिवहन व्यवस्था From Wikipedia, the free encyclopedia
नागपूर मेट्रो ही नागपूर शहरात उभारण्यात येत असणारी मेट्रो प्रणाली आहे. याच्या नागपूर मेट्रो टप्पा २ या मूळ नागपूर मेट्रोच्या विस्तारीत प्रकल्पालाही मंजूरी देण्यात आलेली आहे.[1] महाराष्ट्र सरकारने हिच्या बांधणीसाठी २९ जानेवारी २०१४ रोजी मंजूरी दिली.[ चित्र हवे ][2][3] मुंबई मेट्रो नंतर महाराष्ट्रात नागपूर मेट्रो उभारण्यात येणार आहे.[4] हा प्रकल्प सुरू होईल.[2][3] या प्रकल्पाच्या बांधकामाची सुरुवात ३१ मे २०१५ रोजी झालेली आहे.[5] भारताच्या केंद्रिय मंत्रिमंडळाची मंजूरी मिळाल्यावर व 'मेट्रो रेल्वे अधिनियम १९७८' लागू झाल्यावर २० ऑगस्ट २०१४ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने यास मंजूरी दिली व २१ आॉगस्ट २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
नागपूर मेट्रो | |
---|---|
चित्र:Nagpur Metro Logo.svg | |
स्थान | नागपूर, महाराष्ट्र, भारत |
वाहतूक प्रकार | मेट्रो |
मार्ग | २ |
मार्ग लांबी | ४३ किमी कि.मी. |
एकुण स्थानके | ४२ |
दैनंदिन प्रवासी संख्या | ३,६३,००० (अंदाजित) |
सेवेस आरंभ | ८ मार्च २०१९ |
संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
या प्रकल्पावर ३० सप्टेंबर २०१७ रोजी ट्रायल रन घेण्यात आला. या प्रकल्पाचा एक भाग, म्हणजे यातील केशरी मार्गिका आधी सुरू होईल असा अंदाज आहे.[ संदर्भ हवा ]
या संपूर्ण प्रकल्पापैकी रिच-१ (सिताबर्डी ते खापरी) हा तेरा किमीचा टप्पा व रिच-३ मधील लोकमान्यनगर ते सुभाषनगर हा मार्ग, व्यावसायिक वापरासाठी फेब्रुवारी २०१९ अखेरीसपर्यंत तयार होईल असा अंदाज वर्गविण्यात आला आहे.[6][7] या मेट्रोमध्ये एकूण तीन डबे रहाणार असून महिलांसाठी राखीव असणाऱ्या कोचला 'नारीशक्ती' असे नाव देण्यात आलेले आहे.[8]
नागपूर शहराची लोकसंख्या अंदाजे २४ लाख असून या महानगराच्या सभोवताली असलेल्या ९ तालुक्यांची संख्या ३२.७२ लाख आहे. या शहरात बहुसंख्य इंधनचलित छोटी वाहने आहेत. दुचाकी १०.३३ लाख, तीन चाकी ०.१७ लाख, चारचाकी १.८७ लाख, अशी एकूण वाहने १२.३७ लाख आहेत. या सर्वांमुळे वाहतुकीवर पडणारा ताण, छोट्या रस्त्यांमुळे होणारे अपघात, प्रदूषण, पार्किंग प्रश्न इत्यादींवर उपाय म्हणून हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला.[3]
या प्रकल्पाचा आराखडा दिल्ली मेट्रो रेल्वे कार्पोरेशनने तयार केला होता.[9][10]
यानंतर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने आपला प्रकल्प अहवाल या प्रकल्पाची नोडल एजन्सी असलेल्या नागपूर सुधार प्रन्यासला दि. १२ फेब्रुवारी २०१३ रोजी सादर केला.[11] या प्रकल्पाची अंदाजित संपूर्ण किंमत ही ९० अब्ज रुपये इतकी आहे. यात दोन मार्गिका राहतील.
इ.स. २०२१ पर्यंत नागपूरच्या अंदाजित २.९ लाख लोकसंख्येच्या १२.२१% प्रवासी ही सेवा वापरतील असे अपेक्षित आहे. हा आकडा सुमारे ३६३००० इतका होतो.
स्थानकावर उतरल्यानंतर प्रवाशास पुढे इच्छित स्थळी मार्गक्रमणासाठी, शटल बसेस, बॅटरीवर चालणारी वाहने, पादचारी सेवा व सहभागी तत्त्वावर सायकली इत्यादी गोष्टींच्या पुरवठ्याचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. सर्व वर्गातील प्रवाशांना ही सेवा उपलब्ध असेल जेणेकरून त्यांना आपले घर अथवा कार्यालयातून मेट्रोच्या स्थानकापर्यंत पोहोचणे सोयीचे होईल.[12]
कायमस्वरूपी वेगवान व विनाअडथळा वाहतूक, वायू व ध्वनी प्रदूषणात घट, इंधन बचत, परकीय चलनात बचत, सध्या असलेल्या सार्वजनिक बस वाहतुकीस उत्तम पर्याय.[3]
या प्रकल्पासाठी प्राथमिक अंदाजित, ६६६८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. (सुधारित:८६८० कोटी रुपये)[2] या प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी ही जपानमधील वित्तीय संस्था १.४ टक्के दराने वित्तपुरवठा करणार आहे. एकूण खर्चापैकी ५० % एवढी रक्कम कर्जरूपात उभारण्यात येणार आहे. यात उरलेल्या ५० टक्क्याची वाटणी खालील प्रमाणे राहील : भारत सरकार :२० %, महाराष्ट्र राज्य शासन : २० % , नागपूर महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यास प्रत्येकी ५ % रक्कम.[2]
मेट्रोच्या तिकिटांपासून होणारे उत्पन, जाहिरातीद्वारे होणारे उत्पन, स्थानके व डेपो क्षेत्रांत वाणिज्यिक विकसनाद्वारे निधी उभारणी, महानगरपालिका विकसन शुल्क, आदींद्वारे मिळणारा वित्तीय परतावा १०.३५ टक्के राहील.[3]
अनुमानित वर्षनिहाय खर्च असा आहे[13]:
वित्तीय वर्ष | प्रस्तावित खर्च (कोटी रुपये) |
---|---|
२०१३-१४ | ४५२ |
२०१४-१५ | १०२१ |
२०१५-१६ | १८७४ |
२०१६-१७ | २४१२ |
२०१७-१८ | १९८३ |
२०१८-१९ | ७४० |
२०१९-२०२० | १९८ |
या प्रकल्पासाठी एकूण ७७.६८ हेक्टर (७७६८१९.३० चौ मी) जमीन लागणार आहे. पैकी मिहान प्रकल्पाजवळ ३३.९० हेक्टर (मार्ग क्र.१) तर नीलडोह येथे १५.२४ हेक्टर (मार्ग क्र.२) जमीन घेण्यात येणार आहे.[13]
नागपूर मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पाला महाराष्ट्र शासनाने मंजूरी प्रदान केली आहे. हा प्रकल्प सुमारे २५ किलोमीटर लांबीचा राहणार असून, याचे कार्य जानेवारी २०१३ पासून सुरू होणार आहे. नागपूर हे महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर मेट्रो रेल्वेसाठी तयार झाले असून, या कार्यावर १२५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जानेवारी २०१३ पासून कार्याला प्रारंभ होईल आणि डिसेंबर २०१६ मध्ये ते पूर्णत्वास जाईल. नागपूरची लोकसंख्या वर्तमानात २५ लाख असून, २०३० पर्यंत ही आकडेवारी ५० लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूर शहर मेट्रो रेल्वे सेवेसाठी पात्र ठरणार आहे. मिहान प्रकल्पाच्या प्रारंभी प्रकल्प सल्लागार एल ॲण्ड टी रॅम्बोल यांनी २००१ मध्ये आपल्या सक्षमता अहवालात मेट्रो रेल्वेची प्रस्तावना केलेली आहे. त्यांनी तर १०० किलोमीटरपर्यंत मेट्रो रेल्वे प्रस्तावित केली होती. मात्र शासनाने २५ किलोमीटर पर्यंत तिचा मार्ग राहील असे म्हणले आहे. दरम्यान यातील दुसऱ्या टप्प्यात पारडी नाका ते वाडी नाका, कस्तुरचंद पार्कचा एक विभाग जोडण्यात येईल. तर तिसऱ्या टप्प्यात फुटाळा तलाव ते धंतोली असा मार्ग प्रस्तावित केला होता.
खालील प्रस्तावास मंजूरी देण्यात आलेली आहे. येथील कामठी मार्गावरील ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान असा १९.६५ किमीचा एक मार्ग तर दुसरा मार्ग प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर असा १८.५५ किमीचा मार्ग असेल. यातील एकूण लांबीपैकी ३३.६१ किमी हा उन्नत(एलिव्हेटेड) स्वरूपात तर ४.६० किमी मार्ग हा भूपृष्ठावरून असेल. या एकूण मार्गाचे लांबी सुमारे ३८.२१ किमी राहील.[2]
या कामासाठी नागपूर सुधार प्रन्यास या नागपूरच्या विकासासाठी असलेल्या संस्थेची 'कार्यान्वयन संस्था' म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. 'मेट्रो रेल्वे अधिनियम १९७८' हा केंद्रिय मंत्रिमंडळाकडून लागू करवून घेणे इत्यादी कामे ही संस्था करणार आहे.[4]
पुढे, या प्रकल्पाचे संचलन व अंमलबजावणी करण्याचे दृष्टीने, नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड ही एक 'स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनी' (विशिष्ट प्रयोजन वाहन कंपनी) स्थापण्यात येणार आहे. ही कंपनी स्थापन होईपर्यंत व त्या कंपनीला हे काम सोपवेपर्यंत, नासुप्र हे काम करीत राहील.[4] यात राज्य शासन, महानगरपालिका व नासुप्रचे सहा संचालक राहतील. या सर्वांवर एक उच्चाधिकार समिती राहील.[13]
सन २०१३-२०१४ या आर्थिक वर्षात याचा आरंभ होणार असे प्रस्तावित आहे. हे काम २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे.[2][13]
प्रशासकीय व बांधकाम या दोन्ही गोष्टींसाठी सोयीचे व्हावे म्हणून नागपूर मेट्रोच्या मार्गिकांना रिच-१, रिच-२, रिच-३ व रिच-४ असे विभागण्यात आले आहे. यापैकी रिच १ हा टप्पा खापरी ते सिताबर्डी मेट्रो स्थानक असा आहे. रिच-२ हा टप्पा सिताबर्डी मेट्रो स्थानक ते ऑटोमोटिव्ह चौक असा आहे. रिच-३ हा टप्पा सिताबर्डी मेट्रो स्थानक ते लोकमान्यनगर असा आहे, तर रिच ४ हा सिताबर्डी मेट्रो स्थानक ते प्रजापतीनगर असा आहे.[6][7]
नागपूर मेट्रोमधील केशरी व अॅक्वा मार्गिकांची अंतिम आखणी खालीलप्रमाणे असेल :
नागपूर मेट्रो केशरी मार्गिका (उत्तर-दक्षिण) |
---|
. |
उत्तर - दक्षिण :ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान, विमानतळ मार्गे (केशरी मार्गिका) :[14] प्रवाशांसाठी एकूण १७ स्थानके. (मार्गिकेची लांबी :१९.६५8 किमी; स्थानकांची संख्या :२०[15])
या संपूर्ण मार्गिकेची लांबी (म्हणजे १९.६५८ किमी) ही पूर्णतः उन्नत (एलिव्हेटेड) असणार आहे. फक्त मिहान क्षेत्रामधील विमानतळ स्थानकानंतर खापरी रेल्वे स्थानकापर्यंत त्यात ४.६ किमी इतकी लांबी भू-पातळीवरच (तेथील जमिनीच्या पातळीवरच) असेल. यांत एकूण स्थानके २० आहेत. ज्यापैकी १५ स्थानके ही उन्नत असतील तर, ५ स्थानके ही भू-पातळीवर (जमिनीच्या पातळीवर) असतील. यापैकी सिताबर्डी स्थानक हे अदलाबदली (इंटरचेंज) स्थानक असेल. या मार्गिकेत असलेल्या स्थानकांचे आप-आपसामधील अंतर सरसरी १.२० किमी आहे, पण त्यात, दोन स्थानकांमधील ०.५४ किमी इतके कमी अंतर ते २.४ किमी महत्तम अंतर हा फरकही आहे. हा फरक स्थानकाच्या जागेच्या उपलब्धतेनुसार व संचालनाच्या तसेच प्रवासी आवश्यकतेच्या अनुसार करण्यात आला आहे.
प्रस्तावित स्थानकांची नावे :ऑटोमोटिव्ह, नारी रोड, इंदोरा, कडबी चौक, गड्डीगोदाम चौक, कस्तुरचंद पार्क, शून्य मैल, सिताबर्डी, काँग्रेस नगर, रहाटे कॉलनी, अजनी चौक, छत्रपती चौक, जयप्रकाश नगर, उज्जवलनगर, जुना विमानतळ, नवा विमानतळ, खापरी मेट्रो डेपो.[3] यात पूर्वी असलेला, मार्ग क्र. १ मधील 'भुयारी मार्ग' वगळण्यात आलेला आहे.[3]
स्थानक क्र. | स्थानकाचे नाव | अंतर (मिटर्समध्ये) | मागील स्थानकापासूनचे अंतर | स्थिती |
---|---|---|---|---|
१ | ऑटोमोटिव्ह चौक | ०.० | ०.० | उन्नत |
२ | नारी रोड | ९७५.८ | ९७५.८ | उन्नत |
३ | इंदोरा चौक | २१३९.७ | ११६३.९ | उन्नत |
४ | कडबी चौक | ३१८१.२ | १०४१.५ | उन्नत |
५ | गड्डीगोदाम चौक | ४३९९.० | १२१७.८ | उन्नत |
६ | कस्तुरचंद पार्क | ५१४८.६ | ७४९.६ | उन्नत |
७ | शून्य मैल | ६१७५.५ | १०२६.९ | उन्नत |
८ | सिताबर्डी (अदलाबदली स्थानक) | ६७०९.२ | ५३३.७ | उन्नत |
९ | काँग्रेस नगर | ७८९७.२ | ११८८.० | उन्नत |
१० | रहाटे कॉलनी | ८६८२.६ | ७८५.४ | उन्नत |
११ | अजनी चौक | १०१०४.७ | १४२२.१ | उन्नत |
१२ | छत्रपती चौक | १११४६.३ | १०४१.६ | उन्नत |
१३ | जयप्रकाश नगर | ११८११.५ | ६६५.२ | उन्नत |
१४ | उज्ज्वल नगर | १२८४६.६ | १०३५.१ | उन्नत |
१५ | विमानतळ | १३७८४.९ | ९३८.३ | उन्नत |
१६ | विमानतळ दक्षिण | - | - | भू-पातळीवर |
१७ | नवीन विमानतळ | १६१८४.४ | २३९९.५ | भू-पातळीवर |
१८ | खापरी | १८४६०.६ | २२७६.२ | भू-पातळीवर |
१९ | एको पार्क | - | - | भू-पातळीवर |
२० | मेट्रो सिटी | - | - | भू-पातळीवर |
नागपूर मेट्रो अॅक्वा मार्गिका (पूर्व-पश्चिम) | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
. |
पूर्व-पश्चिम :प्रजापतीनगर ते लोकमान्य नगर (अॅक्वा मार्गिका): एकूण स्थानके १९
ही मार्गिका प्रजापतीनगर या स्थानकापासून सुरू होते व त्यानंतर पश्चिम दिशेस वैष्णोदेवी चौक इत्यादी स्थानकांवरून सिताबर्डी मार्गे लोकमान्यनगर या अंतिम स्थानकास पोहोचते. हा सर्व मार्ग उन्नत आहे.
या स्ंपूर्ण मार्गिकेची लांबी ही १८.५५७ किमी इतकी असून यावर २० स्थानके आहेत. यातील सिताबर्डी स्थानक हे अदलाबदली (इंटरचेंज) स्थानक आहे. या मार्गिकेतील दोन स्थानकांदरम्यानचे सरासरी अंतर हे एक किमी आहे. स्थानकांच्या जागेच्या उपलब्धतेनुसार, हे कमीतकमी ०.६५ किमी ते महत्तम १.२९ किमी इतकेही आहे. हा फरक मेट्रोचे संचालन व प्रवासी आवश्यकता यांचाही विचार केला गेल्यामुळे पडला आहे.
प्रस्तावित स्थानकांची नावे : प्रजापतीनगर, वैष्णोदेवी चौक, आंबेडकर चौक, टेलिफोन एक्स्चेंज चौक, चितार ओळी चौक, दोसर वैश्य चौक, रेल्वे स्थानक, सिताबर्डी (इंटरचेंज), झांसी राणी चौक, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स, शंकर नगर (बँक ऑफ इंडिया), एल ए डी चौक, धरमपेठ विज्ञान महाविद्यालय, सुभाष नगर, रचना रिंगरोड जंक्शन, वासुदेवनगर, बन्सीनगर, लोकमान्य नगर मेट्रो डेपो. (संपूर्ण उन्नत मार्ग)
स्थानक क्र. | स्थानकाचे नाव | अंतर (मितर्समध्ये) | मागील स्थानकापासून अंतर | स्थिती |
---|---|---|---|---|
१ | प्रजापती नगर | ०.० | ०.० | उन्नत |
२ | वैष्णो देवी चौक | १२२९.३ | १२२९.३ | उन्नत |
३ | आंबेडकर चौक | १९४७.९ | ७१८.६ | उन्नत |
४ | टेलिफोन एक्स्चेंज | ३१३७.४ | ११८९.५ | उन्नत |
५ | चितार ओळी चौक | ३९५०.२ | ८१२.८ | उन्नत |
६ | अग्रसेन चौक | ४७५९.८ | ८०९.६ | उन्नत |
७ | दोसर वैश्य चौक | ५५९०.४ | ८३०.६ | उन्नत |
८ | नागपूर रेल्वे स्थानक | ६४६४.४ | ८७४.० | उन्नत |
९ | कॉटन मार्केट | उन्नत | ||
१० | सिताबर्डी (अदलाबदली स्थानक) | ७७०७.७ | १२४३.३ | उन्नत |
११ | झाशी राणी चौक | ८३५४.० | ६४६.३ | उन्नत |
१२ | इंस्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स | ९११७.२ | ७६३.२ | उन्नत |
१३ | शंकर नगर चौक | १००७४.९ | ९५७.७ | उन्नत |
१४ | एलएडी चौक | १०८७३.१ | ७९८.२ | उन्नत |
१५ | अंबाझरी तलाव | १२०२०.७ | ११४७.६ | उन्नत |
१६ | सुभाष नगर | १२९४७.१ | ९२६.४ | उन्नत |
१७ | रचना रिंग रोड जंक्शन | १४२०१.१ | १२५४.० | उन्नत |
१८ | वासुदेव नगर | १५१७३.९ | ९७२.८ | उन्नत |
१९ | बंसी नगर | १६१३१.६ | ९५७.७ | उन्नत |
२० | लोकमान्य नगर | १७७९२.६ | १६६१.० | उन्नत |
२१ | हिंगणा माऊंट व्ह्यू | - | - | उन्नत |
या प्रकल्पाची तांत्रिक माहिती खालीलप्रमाणे आहे:
बाब | वर्णन | शेरा |
---|---|---|
गेज | १४३५ मि मी | - |
वेग | ९५ किमी प्रति तास | महत्तम |
विद्युत पुरवठा | २५ के.व्ही. | ओव्हरहेड |
बोगी | ३ | - |
एका मेट्रोची प्रवासी संख्या | ७६४ | - |
प्रवासी हाताळणीची दैनंदिन क्षमता | ३ लाख | (अपेक्षित) |
तिकिट | स्वयंचलित व स्मार्टकार्ड | - |
डब्यांचा प्रकार | स्टेनलेस स्टील | वातानुकूलित |
सिग्नल पद्धती | एटीपी व एटीओ | - |
स्थानक सुविधा | उद्वहन, एस्केलेटर्स, जिने | - |
दोन्ही मार्ग जंक्शन | मुंजे चौक | एका मार्गावरून दुसऱ्यावर जाण्याची सोय[4] |
वारंवारता | दर सहा मिनिटे | -[4] |
हे सन २०१९ मधील प्रस्तावित भाडे आहे.यात सुधारणा करण्याचे अधिकार भाडे निश्चिती समितीकडे आहेत.[13]
प्रवास अंतर (किमी) | भाडे (रु.) |
---|---|
० ते २ | १५ |
२ ते ४ | १९ |
४ ते ६ | २३ |
६ ते ९ | २८ |
९ ते १२ | ३० |
१२ ते १५ | ३४ |
१५ ते १८ | ३६ |
१८ ते २१ | ३९ |
२१ पेक्षा जास्त | ४१ |
या प्रकल्पाचे नाव माझी मेट्रो राहणार आहे.[16]
नागपूर शहरासोबतच त्याशेजारील गावांचाही विकास व्हावा या उद्देशाने नागपूर मेट्रोची व्याप्ती भंडारा, रामटेक, काटोल व वर्धा येथवर करण्याचे ठरविण्यात आलेले आहे. हा पुढील प्रकल्प ३३० कोटींचा आहे.[17]
महामेट्रोने याबबतचा आपला प्रकल्प अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर केला होता.राईट्स या रेल्वेच्या कंपनीने हा अहवाल तयार केला होता. सन २०१८ चे दरपत्रक लक्षात घेता, याचा खर्च सुमारे १०,५०० करोड रुपये इतका आहे.यात ३५ स्थानकांसह ५ विस्तारीत मार्ग आहेत. या सर्वांची एकत्रित लांबी सुमारे ४८.३ किमी इतकी राहील.[18][19]
महाराष्ट्र राज्याच्या नागरी विकास खात्याने या वर नमूद प्रस्तावास मंजूरी दिली आहे.[20] हा प्रस्ताव ११,२१६ कोटींचा असून,[20] हा प्रस्ताव दिनांक ८ जानेवारी रोजी होणाऱ्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठेवला जाईल व त्यास मंजूरीनंतर तो केंद्रीय मंत्रीमंडळाच्या मंजूरीसाठी पाठविण्यात येणार आहे.[20]
या प्रस्तावास महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळाने दि. ०८-०१-२०१९ ला मंजूरी दिली आहे.[1][21]
या एकूण खर्चापैकी ६०% रक्कम ही महामेट्रोद्वारे कर्जामार्फत उभारण्यात येणार आहे. तर राज्य व केंद्र सरकार यापैकी प्रत्येकी २०% रक्कम देईल.[20] या कामास सुमारे ४ वर्षे लागतील असा अंदाज आहे.[19]
नागपूर मेट्रोचा मूळ प्रकल्प (टप्पा १) व नागपूर मेट्रो टप्पा २ या दोन्ही प्रकल्पात करण्यात येणारी एकूण गुंतवणूक १९,८९६ कोटी इतकी राहील. दोन्ही टप्प्यांची एकत्रित लांबी ही ८६ किमी इतकी राहील. त्यात दोन्ही मिळून ७३ स्थानके असतील. सन २०२४ पर्यंत, नागपूर मेट्रोच्या प्रथम टप्प्यात २.६ लाख तर दुसऱ्या टप्प्यात २.९ लाख इतके प्रवासी दररोज प्रवास करतील असे अंदाजित आहे. तर, सन २०२९ पर्यंत हाच आकडा पहिल्या टप्प्यातून २.९ लाख तर दुसऱ्या टप्प्यातून सुमारे ३.४ लाख दररोजचे प्रवासी इतका असेल. सन २०४१ पर्यंत यात दररोज एकूण ७.७ लाख प्रवासी प्रवास करतील असा अंदाज करून या प्रकल्पाची एकूण आखणी करण्यात आलेली आहे.[1]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.