नागपूर
भारताच्या महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आणि मध्य भारतातील सगळ्यात मोठे शहर / From Wikipedia, the free encyclopedia
नागपूर (इंग्रजी : Nagpur) हे महाराष्ट्र राज्याचे उपराजधानीचे शहर आहे व राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. नागपूर हे भारतातील तेरावे मोठे नागरी क्षेत्र (urban conglomeration) आहे. नागपूर महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील सर्वांत मोठे शहर, नागपूर जिल्हा व राज्याच्या नागपूर विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूरात घेतले जाते. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड आहे. नागपूर हे भारताचे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया आहे. नागपूरास संत्रानगरी असेही म्हणतात, कारण या भागातील संत्री प्रसिद्ध आहेत. नागपूरच्या आसपास संत्र्याच्या मोठ्या बागा असून खूप संत्री पिकतात. त्यामुळे येथे संत्र्याची मोठी बाजारपेठ आहे.[3] २००२ साली शहराचा ३००वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. नजीकच्या संभाव्य आर्थिक गुंतवणुकीमुळे नागपूर शहर बहुचर्चेत आहे.
?नागपूर महाराष्ट्र • भारत | |
टोपणनाव: संत्रानगरी Tiger Capital of India" | |
— शहर — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
२१७.६५ चौ. किमी • ३१० मी |
जवळचे शहर | वर्धा आणि बुटीबोरी |
प्रांत | महाराष्ट्र |
जिल्हा | नागपूर |
लोकसंख्या • घनता |
२४,२०,०००[1] (२००६) • ११,११९/किमी२ |
भाषा | मराठी |
महापौर | |
उपमहापौर | |
आयुक्त | |
स्थापना | १७०२ [2] |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४४०००१ • +०७१२ • MH-३१ (नागपूर पश्चिम) MH-४९ (नागपूर पूर्व) MH-४० (नागपूर ग्रामीण) |
संकेतस्थळ: www.nagpur.nic.in | |
नागपूर चिन्ह |