नथुराम गोडसे
महात्मा गांधींचा हत्यारा / From Wikipedia, the free encyclopedia
नथुराम विनायक गोडसे (मे १९, इ.स. १९१०; बारामती, पुणे जिल्हा, महाराष्ट्र - नोव्हेंबर १५, इ.स. १९४९) हा महात्मा गांधी चा मारेकरी होता. त्याने ३० जानेवारी १९४८ रोजी नवी दिल्ली येथे गांधीच्या छातीवर तीन गोळ्या झाडल्या.[1] गोडसे हा पुण्यातील हिंदुत्ववादी होता.[2] तसेच तो हिंदू महासभेचा सदस्य होता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) माजी सदस्य होता.[3][4] १९४७ च्या भारताच्या फाळणीच्या वेळी गांधींनी ब्रिटिश भारतातील मुस्लिमांच्या राजकीय मागण्यांना अनुकूलता दर्शवली असे त्याचे मत होते.[5][6] त्याने नारायण आपटे आणि इतर सहा जणांसोबत हत्येचा कट रचला.
हा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.
|
आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
विकिस्रोतावर काय चालेल ?
प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
- ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.
- ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.
- ऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
नथुराम विनायक गोडसे | |
---|---|
जन्म |
१९ मे १९१० (1910-05-19) बारामती, पुणे, ब्रिटिश भारत |
मृत्यू |
१५ नोव्हेंबर, १९४९ (वय ३९) अंबाला, पंजाब, भारत |
मृत्यूचे कारण | फाशी |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
ख्याती | गांधी-हत्या |
वडील | विनायक वामनराव गोडसे |
आई | लक्ष्मी विनायक गोडसे |
एक वर्षभर चाललेल्या खटल्यानंतर, गोडसेला ८ नोव्हेंबर १९४९ रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. गांधींचे दोन पुत्र, मणिलाल गांधी आणि रामदास गांधी यांनी क्षमायाचना केल्या होत्या, परंतु त्या भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल आणि गव्हर्नर-जनरल सी. राजगोपालाचारी यांनी फेटाळून लावल्या.[7] गोडसे याला 15 नोव्हेंबर 1949 रोजी अंबाला मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली.[8]