भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा. Maharashtra Crown of Nandurbar From Wikipedia, the free encyclopedia
हा लेख नंदुरबार जिल्ह्याविषयी आहे. नंदुरबार शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा | |
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा | |
महाराष्ट्र मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र |
विभागाचे नाव | नाशिक |
मुख्यालय | नंदुरबार |
तालुके | नंदुरबार ,नवापुर ,शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी (धडगाव) |
क्षेत्रफळ | |
- एकूण | ५,०३५ चौरस किमी (१,९४४ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
-एकूण | १३,०९,१३५ (२०११) |
-लोकसंख्या घनता | २६० प्रति चौरस किमी (६७० /चौ. मैल) |
-साक्षरता दर | ४६.६३% |
प्रशासन | |
-लोकसभा मतदारसंघ | नंदुरबार (लोकसभा मतदारसंघ) |
-विधानसभा मतदारसंघ | अक्कलकुवा • नंदुरबार • नवापूर • शहादा |
-खासदार | हिना गावित (भाजपा) |
पर्जन्य | |
-वार्षिक पर्जन्यमान | ८५९ मिलीमीटर (३३.८ इंच) |
प्रमुख_शहरे | नंदुरबार ,शहादा, नवापूर ,तळोदा |
संकेतस्थळ |
नंदुरबार हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सातपुडा प्रदेशातील एक आदिवासी (tribal ) जिल्हा आहे, १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्यातून बाहेर पडून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली. हा जिल्हा महाराष्ट्र व गुजरात व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेजवळ असून याचे क्षेत्रफळ ५०३५ चौरस कि.मी. आहे. येथील लोकसंख्या १३,११,७०९ असून त्यांपैकी १५.४५% लोक शहरी भागात राहतात. (२००१ च्या जनगणनेनुसार). हा भाग आदिवासी बहुल असून निसर्गाच्या वैविध्याने पूर्णपणे परिपूर्ण असा आहे. तसेच अक्ककलकुुवा तालुक्यातील राजवाडी होळी हा प्रमुख सण मानला जातो. प्रामुख्याने काठीच्या आदिवासी संस्कृतीतली होळी ही मोठ्या स्वरूपात होत असून तत्पश्चात भरणाऱ्या बाजारास भोंगऱ्या म्हणतात
नंदुरबार एक आदिवासी जिल्हा आहे , जिल्ह्याला दोन राज्यांच्या सीमा लाभल्या आहेत. गुजरात राज्य वायव्य सीमेवर, तर मध्य प्रदेश राज्य जिल्ह्याच्या ईशान्य सीमेवर आहे. सीमा भागातील काही गावे (उदा. खेडदिगर व खेतिया) ही महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश ह्या दोन्ही राज्यांत विभागली गेली आहेत.
नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा असून येथील लोकसभा व विधानसभा मतदार संघ हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आदिवासी मतदार संघ आहेत.
जमाती :-
पाडवी -भिल्ल, पावरा, तडवी-भिल्ल, वळवी, वसावे ,टोकरे कोळी, ढोर कोळी , महादेव कोळी , कोकणा-कोकणी, गावित, मावची, धानका, इत्यादी प्रमुख आदिवासी जमाती आहेत.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.