![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/4a/Dadabhai_Naoroji%252C_1892.jpg/640px-Dadabhai_Naoroji%252C_1892.jpg&w=640&q=50)
दादाभाई नौरोजी
From Wikipedia, the free encyclopedia
दादाभाई नौरोजी (रोमन लिपी: Dadabhai Naoroji ;) (जन्म : वर्सोवा-मुंबई, ४ सप्टेंबर, इ.स. १८२५; - महालक्ष्मी-मुंबई, ३० जून, इ.स. १९१७) हे पारशी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, कापूस-व्यापारी व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतील होते. त्यांनी लिहिलेल्या पॉव्हर्टी ॲन्ड अन-ब्रिटिश रूल इन इंडिया (अर्थ: भारतातील अ-ब्रिटिश राजवट आणि गरिबी) या पुस्तकाने भारतातील संपत्तीचा ओघ ब्रिटनकडे कसा वाहिला जात होता, याकडे लक्ष वेधले. इ.स. १८९२ ते इ.स. १८९५ या कालखंडात ते ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ गृहात संसदसदस्य होते. ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले ते पहिलेच आशियाई व्यक्ती ठरले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या स्थापनेचे श्रेय ए.ओ. ह्यूम व दिनशा एडलजी वाच्छा यांच्यासह दादाभाई नौरोजींना दिले जाते.
जलद तथ्य मागील, पुढील ...
दादाभाई नौरोजी दोर्डी | |
![]() | |
ब्रिटनमधील खासदार | |
कार्यकाळ इ.स. १८९२ – इ.स. १८९५ | |
मागील | फ्रेडरिक थॉमस पेंटोन |
---|---|
पुढील | विल्यम फ्रेडरिक बार्टन मस्से-मेंवरिंग |
जन्म | ०४ सप्टेंबर १८२५ मुंबई, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू | जून ३०, इ.स. १९१७ महालक्ष्मी ,मुंबई |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
आई | माणकबाई नौरोजी दोर्डी |
वडील | नौरोजी पालनजी दोर्डी |
पत्नी | गुलबाई |
निवास | लंडन युनायटेड किंग्डम |
व्यवसाय | बॅरिस्टर |
धर्म | पारशी |
बंद करा