Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
गोविंद श्रीपाद तळवलकर (जन्म : डोंबिवली, २२ जुलै, इ.स. १९२५; - ह्युस्टन (अमेरिका), २२ मार्च, इ.स. २०१७) हे इंग्रजी-मराठीतले पत्रकार व लेखक होते. वृत्तपत्रीय अग्रलेखांकरिता विशेषत्वाने परिचय असलेले ते एक स्तंभलेखक होते. सामाजिक , राजकीय, आंतरराष्ट्रीय घडामोडीचे भाष्यकार , साचेपी संपादक म्हणून त्यांची ख्याती आहे.
गोविंद तळवलकर | |
---|---|
जन्म नाव | गोविंद श्रीपाद तळवलकर |
जन्म |
२२ जुलै, १९२५ डोंबिवली |
मृत्यू |
२२ मार्च, २०१७ ह्युस्टन, अमेरिका |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | पत्रकारिता, साहित्य, इतिहास |
भाषा | मराठी, इंग्रजी |
साहित्य प्रकार | इतिहास, लेख |
कार्यकाळ | १९४८-२०१७ |
विषय | माहितीपर, आंतरराष्ट्रीय घडामोडी, |
प्रसिद्ध साहित्यकृती | सोवियत साम्राज्याचा उदय आणि अस्त |
प्रभाव | लोकमान्य टिळक, मानवेंद्रनाथ रॉय, पंडित जवाहरलाल नेहरू |
वडील | श्रीपाद तळवलकर |
पुरस्कार | रामनाथ गोयंका जीवनगौरव, लोकमान्य टिळक पुरस्कार आणि रामशास्त्री पुरस्कार |
तळवलकर हे लोकसत्ताचे बारा वर्षे उप-संपादक होते, तर महाराष्ट्र टाइम्सचे २७ वर्षे संपादक होते [१].
गोविंद तळवलकर यांचा जन्म डोंबिवली येथे झाला.[२] त्यांना दोन मुली होत्या. १९९६ मध्ये निवृत्ती घेतल्या नंतर ते अमेरिकेतील ह्युस्टन येथे त्यांच्या मुलीकडे वास्तव्यास होते.[३]
गोविंद तळवलकरांनी १९४७ साली बी.ए. झाल्यानंतर शंकरराव देव यांच्या नवभारतमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पुढे १९५० ते १९६२ अशी बारा वर्षे ते लोकसत्तामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत होते. १९६२-६७ च्या दरम्यान त्यांना महाराष्ट्र टाइम्समध्ये काम करण्याची संधी मिळाली. १९६८ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि पुढे १९९६ पर्यंत म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस वर्षे महाराष्ट्र टाइम्ससारख्या अग्रणी वृत्तपत्राचे संपादक म्हणून आपली कारकीर्द त्यांनी गाजवली. महाराष्ट्र टाइम्सला महाराष्ट्रातील एक प्रभावी व परिणामकारक दैनिक म्हणून घडविण्यात तळवलकरांचा सिंहाचा वाटा आहे.[२]
टाइम्स ऑफ इंडिया, इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द हिंदू, द डेक्कन हेरॉल्ड, रॅडिकल ह्युमनिस्ट, फ्रंटलाइन मॅगझिन अशा इंग्रजी वृत्तपत्रांतून आणि साप्ताहिकांतूनही तळवलकरांनी लेखन केले.[२] ते "Asian Age" साठी अमेरिकेतूनही लिहीत असत.[४]
त्यांचे बरेचसे लेखन पुस्तकरूपातही प्रकाशित झाले आहे. लोकमान्य टिळकांची परंपरा जपणारे आणि संतांप्रमाणे सामान्यांनाही समजेल अशी लेखनशैली जोपासणारे तळवलकर हे खऱ्या अर्थाने 'अग्रलेखांचे बादशहा' होते. भाषेवरील प्रभुत्व, राजकीय आणि सामाजिक भान आणि प्रचंड व्यासंग या जोरावर त्यांनी अग्रलेखांना एका वेगळ्या उंचीवर नेले होते. कवी ग.दि. माडगुळकरयांनी त्यांचा उल्लेख 'ज्ञान गुण सागर' असा केला होता.
तळवलकरांवर सुरुवातीला एम. एन. रॉय यांच्या विचारांचा प्रभाव होता.
गोविंद तळवळकरांच्या लेखनाच्या प्रभावाने किमान दोन पिढ्यांचे बौद्धिक पोषण झाले.[२]
आपल्या लेखनातून तळवलकरांनी वेळोवेळी महात्मा गांधींवर होणाऱ्या टीकांना मुद्देसूद उत्तरे दिली होती.[ संदर्भ हवा ]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.