जपानची राजधानी आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेले प्रीफेक्चर From Wikipedia, the free encyclopedia
तोक्यो (अन्य लेखनभेद: टोक्यो, टोकियो ; जपानी: 東京都; रोमन लिपी: Tokyo; अधिकृत नावः तोक्यो महानगर (東京都 - तोऽक्योऽ तो))[1] ही जपान देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. तोक्यो हा जपानमधील ४७ पैकी एक प्रांत (प्रांत), तसेच जपानमधील सर्वात मोठ्या महानगरीय प्रदेशाचे केंद्रस्थान आहे.
तोक्यो महानगरीय प्रांतामध्ये २३ विभाग (वॉर्ड) असून एकूण ३९ महानगरपालिका ह्या प्रांताच्या हद्दीत येतात. ह्यांची लोकसंख्या सुमारे १.३ कोटी इतकी आहे. ३.५ कोटी एकत्रित लोकसंख्या असलेला हे जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा महानगर तसेच जगातील सर्वात मोठे आर्थिक उलाढालीचे केंद्र आहे.[2] न्यू यॉर्क व लंडनसोबत तोक्योचा जगातील सर्वात मोठे आर्थिक महासत्ताकेंद्र असा उल्लेख केला गेला आहे. २०२० सालच्या उन्हाळी ऑलिपिंक स्पर्धा तोक्यो येथे आयोजित केल्या जातील.[3]
तोक्योला पूर्वी इडो या नावाने ओळखले जात असे. इडो म्हणजे जपानी भाषेत ’मुख’. १८६८ मध्ये इडोला जेव्हा जपानची राजधानी बनवले गेले तेव्हा त्याचे नाव बदलवून तोक्यो (तोउक्योउः तोउ (पूर्व) + क्योउ (राजधानी)) असे ठेवले गेले. सुरुवातीच्या मेईजी काळात या शहराला "तोउकेइ"च्या नावाने सुद्धा ओळखले जायचे. या शब्दाचा अर्थ चीनी भाषेत "लिहिले गेलेले शब्द" असा होतो.. अनेक जुन्या इंग्रजी दस्ताऐवजांमध्ये मध्ये "टोकेई" (Tokei) लिहिल्लेगेले आहे. परंतु आता हा शब्द अप्रचलित झाला आहे. आणि "तोक्यो" या शब्दाचाच उपयोग केला जातो.
प्राइसवॉटर हाऊसकूपर्स द्वारा केल्या गेलेल्या सर्वेक्षणानुसार, तोक्यो नागरी क्षेत्राचे (लोकसंख्या ३.५२ करोड़) २००८ मधील क्रयशक्तीच्या आधारे एकूण उत्पन्न अंदाजे १,४७९ अब्ज अमेरिकी डॉलर होता. हे त्या यादीतले सर्वाधिक उत्पन्न होते. सन २००८ पर्यंतच्या माहितीप्रमाणे जगातील ५०० सूचिबद्ध कंपन्यांपैकी ४७ कंपन्यांचे मुखालय तोक्योत आहे. हा आकडा दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या पैरिसच्या दुप्पट आहे.
जगातील सर्वात मोठे निवेश बँकांचे आणि विमा कंपन्यांचे मुख्यालय तोक्योत आहे. हे शहर जपानच्या परिवहन, प्रकाशन, आणि प्रसारण उद्योग क्षेत्राचे प्रमुख केंद्र आहे. द्दुसऱ्या महायुद्धानंतर जपानच्या अनेक व्यवसाय संस्था आपले मुख्यालय ओसाका वरून तोक्योला घेऊन गेल्या[4]. परंतु शहराची वाढती लोकसंख्या आणि तेथील महाग जीवनस्तरामुळे आता हा प्रकार थांबला आहे..
’इकॉनॉमिस्ट इन्टेलिजन्स यूनिट’ने तोक्योला गेली १४ वर्षांपासून जगातले सर्वात महाग शहर ठरवले आहे. २००६ मध्ये इथली महागाई स्थिरावली. तोक्योचा शेअर बाजार हा जपानमधील सर्वात मोठा शेअर बाजार., जगातला दुसरा भांडवलबाजार आणि शेअर विक्रीच्या बाबतीत जगातला चौथा सर्वात मोठा बाजार आहे.
तोक्यो ही जपानची राजधानी असल्यामुळे साहजिकच जपानमधील सर्वात मोठे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रेल्वे, वायू, आणि जमिनीय वाहतुकीचे केंद्र आहे. तोक्योची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था साफ-स्वच्छ आहे. येथे भुयारी रेल्वेचे विशाल जाळे आहे रेल्वे, बस, मोनोरेल आदी सर्वच वाहतुकीच्या नियंत्रणासाठी अनेक यंत्रणा काम करतात.
तोक्योच्या महानगरक्षेत्रात ओता येथील हानेडा विमानतळ व चिबा प्रांतातील नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ हे तोक्यो शहराला विमानसेवा पुरवणारे दोन विमानतळ आहेत. जपान एरलाइन्स व ऑल निप्पॉन एरवेज ह्या जपानमधील सर्वात मोठ्या विमान वाहतूक कंपनींची मुख्यालये तोक्योमध्येच स्थित आहेत. तोक्यो विमानतळ प्रणाली लंडन व न्यू यॉर्क शहराखालोखाल जगातील सर्वात वर्दळीची आहे.
स्थानिक रेल्वे ही तोक्योमधील वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. व्यवस्तेचे प्रमुख साधन आहे सुद्धा जगातली सर्वात मोठी महानगरीय रेल्वे वाहतूक आहे.. जे.आर ईस्ट ही कंपनी रेल्वेचे संचालन करते. खासगी आणि सरकारी भुयारी रेल्वेवाहतुकीसाठी तोक्यो मेट्रो आणि सरकारी तोक्यो महानगर वाहतूक ब्यूरो अशा दोन कंपन्या आहेत. अशाच दोन कंपन्या सरकारी आणि खासगी बसवाहतुकीसाठी आहेत. रेल्वेच्या प्रमुख टर्मिनल्सपासून स्थानिक, क्षेत्रीय व राष्ट्रीय रेल्वेमार्ग फुटतात. तोक्यो रेल्वे स्थानक जपानमधील सर्वात वर्दळीचे असून येथून अनेक शिंकान्सेन मार्ग सुरू होतात.
कांतो, क्यूशू आणि शिकोकू बेटांना जोडण्यासाठी तोक्योपासून गतिमार्ग आहेत.
त्याशिवाय रिक्षा हे स्थानिक वाहतुकीचे आणखी एक साधन आहे. तोक्योच्या बेटापासून दूर अंतरापर्यंत बोटीने प्रवास करता येतो. प्रवासी आणि सामान यांच्या देशान्तर्गत आणि आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी तोक्यो बेटाजवळ्च बंदर आहे.
तोक्योमध्ये अनेक विद्यापीठे, महाविद्यालये आणि प्रोफेशनल शाळा आहेत. तोक्यो विद्यापीठ, हितोत्सूबाशी विद्यापीठ, तोक्यो प्रौद्योगिकी संस्था, वासीदा विद्यापीठ आणि किओ विद्यापीठासारखी जपानच्या नावाजलेल्या विद्यापीठांपैकी काही विद्यापीठे तोक्योत आहेत. त्याशिवाय,
तोक्योमध्ये विविध प्रकारचे खेळ खेळल्या जातात, आणि इथे दोन व्यावसाईक बेसबॉलश क्लब सुद्धा उपलब्ध आहे , योमियूरी जायंट्स जे टोक्यो डोम मध्ये खेळल्या जाते आणि तोक्यो याकुल्ट स्वैलोज जे मेइजेई-जिंगू स्टेडियम मध्ये खेळल्या जाते. जापान सूमो संघचे मुख्यालय सुद्धा टोक्यो मधील र्योगोकू कोकूजिकन सूमो एरीना मध्ये स्थित आहे जिथे तीन वार्षिक आधिकारिक सूमो प्रतियोगिता आयोजित केल्या जाते. (जानेवारी , मे , आणि सप्टेंबर ) टोक्योचे फुटबॉल क्लब आहे एफ. सी. टोक्यो आणि तोक्यो वेर्डी १९६९, आणि दोघेही ही अजिनोमोतो स्टेडियम, चोफू मध्ये खेळतात.
टोकियो हे 1964 आणि 2020 उन्हाळी ऑलिंपिकचे यजमान शहर होते. राष्ट्रीय स्टेडियम, ज्याला ओलंपिक स्टेडियम, टोक्योच्या नावाने सुद्धा ओळखल्या जाते. इथे पुष्कळ अंतर्राष्ट्रीय खेळ प्रतियोगिताचे आयोजन केल्या जाते. तोक्योमध्ये टेनिस, स्वीम्मिंग , मैराथन, जूड़ो, कराटे इत्यादी आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले जाते.
तोक्योमधील पर्यटन स्थळे :-
या टॉवरची निर्मिती १९५८ मध्ये झाली.. ३३३ मीटर उंच असे हे टॉवर एफिल टॉवरपेक्षा १३ मीटर उंच आहे. इथे दोन वेधशाळा सुद्धा आहेत. या ठिकाणाहून्तोक्योचे विहंगम दर्शन होते. साफ वातावरणात येथून माउंट फ़्यूजीसुद्धा दिसतो.. मुख्य वेधशाळा १५० मीटर उंच आहे आणि विशेष वेधशाळा २५० मीटर उंच आहे. या टॉवरच्या आत तोक्यो टॉवर मेणाचे संग्रहालय, एक गूढ रहस्यमय क्षेत्र आणि हस्तकला दालनही आहे.
तोक्यो स्कायट्री 2010 मध्ये बांधले गेले आणि जगातील सर्वात उंच फ्री-स्टँडिंग ब्रॉडकास्टिंग टॉवर आहे, ज्याची उंची 634 मीटर आहे. यात 350 आणि 450 मीटरवर दोन निरीक्षण डेस्क आहेत.[5]
हे मंदिर शिंतो वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. या मंदिराची निर्मिती १९२० साली येथील शासक मीजी (१९१२)च्या स्मरणार्थ केली गेली आहे. हे स्थळ ७२ हेक्टर जमिनीवर पसरलेल्या बागांनी आणि जपानी झाडांनी वेढलेल्या मीजी जिंगू पार्कने व्यापले आहे. हे स्थान जपानमधील सर्वात सुंदर आणि पवित्र जागांपैकी एक आहे.
अमेयोको हे पादत्राणांपासून ते कपडे, आणि सर्व प्रकारच्या वैयक्तिक वापराच्या वस्तू मिळण्याचे ठिकाण आहे. हा बाजार उएनो स्टेशनपासून जवळ असल्याने पर्यटक या बाजारात जाणे पसंत करतात. येथे पर्यटक जपानच्या कलावंत कामगारांना जवळून बघू शकतात आणि त्यांच्याकडून चित्रविचित्र वस्तू कमी भावात मिळवू शकता.
अभ्यागतांसाठी टोकियोच्या लोकप्रिय ठिकाणांची आणि आकर्षणांची यादी खालीलप्रमाणे आहे:
२०२२मध्ये तोक्योने २२ शहरे आणि राज्यांशी मैत्रीकरार केले आहेत.[7]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.