जॉर्ज इव्होनोविच गुर्जेफ
From Wikipedia, the free encyclopedia
जॉर्ज इवानोविच गुर्जेफ (रोमन : George Ivanovich Gurdjieff, आर्मिनिअन : Գեորգի Իվանովիչ Գյուրջիև, जॉर्जिअन : გიორგი გურჯიევი, ग्रीक : Γεώργιος Γεωργιάδης, रशियन : Гео́ргий Ива́нович Гюрджи́ев, जानेवारी १३, इ.स. १८६६ – ऑक्टोबर २९, इ.स. १९४९) हा विसाव्या शतकाच्या मध्यात होऊन गेलेला प्रभावी आध्यात्मिक गुरू होता. बरीचशी मानवजात ही संमोहित "जागत्या निद्रेत" आहे; चेतनेचे उच्चतर स्तर गाठणे आणि संपूर्ण मानवी क्षमता प्राप्त करणे शक्य आहे अशी त्याची शिकवण होती. असे करण्यासाठी गुर्जेफने एक पद्धत विकसित केली आणि तिला 'द वर्क'[1] किंवा 'द मेथड'[2] असे नाव दिले. या पद्धतीच्या तत्त्वांनुसार आणि सूचनांनुसार[3] ती फकिर, योगी किंवा साधू यांच्या चेतनाजागृतीच्या पद्धतीपेक्षा वेगळी आहे; म्हणून (मुळात) तिला "चौथा मार्ग"[4] असे म्हटले जाते.