महाराष्ट्र राज्यातील एक जिल्ह्याचे ठिकाण. From Wikipedia, the free encyclopedia
[[वर्ग:महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे]]
?जालना महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | जालना |
लोकसंख्या • घनता लिंग गुणोत्तर |
५,१९,०१८ (२०२१) • २५४/किमी२ ९३७ ♂/♀ |
आमदार | कैलास गोरंट्याल |
कोड • पिन कोड |
• 431203 |
संकेतस्थळ: jalna.nic.in/ |
जालना हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर असून जालना जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. जालना शहराचे पूर्वीचे नाव जालनापूर होते.
जालना शहर हे भारताच्या स्वतंत्र पूर्वी मुघल सम्राज व त्यानंतर निझाम च्या ताब्यात होते, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील जालना जिल्हा तसेच औरंगाबाद, उस्मानाबाद, नांदेड, बीड, परभणी हे जिल्हे देखील निझाम साम्राज्याच्या हैदराबाद राज्य मध्ये समाविष्ट होते. शहरात अमृतेश्वर मंदिर, बारव असुन आजही सुस्थितीत आहे. आनंदी स्वामी मंदिर, दत्त मंदिर पहायला मिळतात तसेच मुघल कलिन काळी मशिद, मोती तलाव जे जमशेद खान निझामि अधिकारी याने काली मशिद ला पाणी पोहचिण्यासाठी बांधले होते तसेच मस्तगड किल्ला, जैनुल्ला शाह (मिया सहाब) दर्गा, वेशी ही जालना शहराचे आकर्षण आहे.
मराठीतील महानुभाव पंथाच्या आद्य कवयित्री महदंबा या अंबड तालुक्यातील रामसगावच्या आहेत, असे सांगितले जाते. मात्र, जालना येथे झाले्ल्या ६व्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनात महदंबेच्या जन्मस्थळावरून वाद झाले. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले यांनी महदंबा जालना जिल्ह्यातील नव्हे, तर औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील असल्याचे सांगितले, तर संमेलनानिमित्त काढलेल्या ममानिनीफ या स्मरणिकेतील लेखात प्रा. डॉ. सुधाकर जाधव यांनी महदंबेचा जन्म पुरी (पांढरी, तालुका गेवराई, जिल्हा बीड) गावातील असल्याचा उल्लेख केला.रोहिलागड हे ऐतिहासिक गाव जालना जिल्ह्यात येते. हंबीरराव मोहिते उर्फ चव्हाण घराणे ता. जि. जालना येथील मंहमंदाबाद (पिंपळगाव) येथे राहते. त्यांचे 5 वाडे असुन 3 भव्य वास्तु व मोठी गढी आहे व तसेच बुरूजाजवळच निळकंठराव मोहिते-चव्हाण (हंबीरराव) यांची समाधी आहे.
जालन्याचे जुने नाव जालनापुर असे होते. नोव्हेंबर 1679 ला खासा छत्रपती वीरशिवाजी महाराजांनी जालना येथे स्वारी केली. रण मस्तखान राजेंवर चालुन आला, त्यांच्यात युद्ध झाले या युद्धात राजे शिदोजी निंबाळकर पडले. रणमस्तखानाला कैद केले. केशरसिंग व सरदार खान आणि बाजी उमराव हे फौज घेऊन जालन्यात कडे निघाले. तो वर राजे व मावळ्यांनी पट्टा गडाकडे कूच केली.
१. जालना येथे मोसंब्यांची मोठी बाजारपेठ आहे. तसेच परतूर एक महत्त्वाचा तालुका आहे येथे भक्त प्रल्हाद काही काळ वास्तव्यास होते परतूरचे जुने नाव प्रल्हादपूर असे होते.
२. रोहिलागड हे मोठा बाजारपेठेचे गाव आहे.
३. जालना हे बी-बियाणे उद्योगच्या नावाने ओळखले जाते.
४. जालना जिल्यात एकूण आठ तालुके आहेत.
५. जालना जिल्ह्यातील राजुर हे गाव तिर्थक्षेत्र म्हणून आहे. ते भोकरदन तालुक्यात आहे , तिथे गणपती मंदिर आहे.
६. जालना शहरातुन कुंडलिका नदी जाते.
७. जालना जिल्ह्यातुन जाणारी गोदावरी नदी जिल्ह्यातील अनेक गावांची तहान भागविते.
८. जालना जिल्ह्यातील जांब हे गाव संत रामदास स्वामी यांचे जन्मगाव आहे. येथे श्रीमंत इंदिराबाई होळकर यांनी अन्नछत्र सुरू केलेले असुन त्यांचा शिलालेख तेथे पहायला मिळतो तर अहिल्यादेवी होळकर यांनी गावात बारव निर्माण केलेली आहे.
९. आसई युद्ध, अंबडचे मराठा इंंग्रज युद्ध
जालना रेल्वे स्थानक हे दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावर आहे. जालन्याहून भारताच्या अनेक प्रमुख शहरांसाठी थेट प्रवासी रेल्वे सेवा उपलब्ध आहे.[1] मुंबईहून औरंगाबादपर्यंत धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस ऑगस्ट २०१५ मध्ये जालन्यापर्यंत वाढवण्यात आली. ह्याव्यतिरिक्त तपोवन एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस. नंदीग्राम एक्सप्रेस, अजिंठा एक्सप्रेस इत्यादी गाड्या जालन्याहून रोज धावतात.
महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेला नागपूर–औरंगाबाद–मुंबई द्रुतगती मार्ग जालन्यामधूनच जाईल असा अंदाज आहे. शासनाने जालना-खामगाव लोहमार्गालाही मंजूरी दिली आहे. औरंगाबाद ते जालना अंतर जवळपास 75 कि.मी. आहे.
१. जालना शहरापासून ४६ कि.मी. अंतरावर शंभू महादेवाचे एक जागरूक देवस्थान आहे. तेथून जवळच नेर या गावात वटेश्वर महाराज मंदिर आहे; तेथे महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरते.
२. येथून २५ कि.मी. वर राजूर गणपती हे देवस्थान आहे
३. जालना शहरापासून १५ कि.मी. अंतरावर देऊळगाव राजा रोडवर वाघरूळ देवीचे मंदिर आहे.
४. जालना पासून १० कि.मी. अंतरावर सिंदखेड राजा रोड वर माळाचा गणपती तसेच त्याच रस्त्यावर अलीकडे जालना बसस्थानकापासून अंदाजे ५ कि.मी. अंतरावर प्रसिद्ध दत्ताश्रम आहे जेथे वर्षभर काही न काही आध्यात्मिक कार्यक्रम होत असतात.
५.जालन्यापासून ४४ कि.मी. अंतरावर अंबड पासून १७ कि.मी. वर जांबुवंतगड, जामखेड ता. अंबड येथे रामायण काळातले व हनुमानानंतर श्रीरामांचे निस्सीम भक्त श्री जांबुवंत महाराजांचे मंदिर आहे.
६. तसेच त्या शेजारी रोहिलागड ता. अंबड या ऐतिहासिक गावी येथे अनेक प्राचीन मंदिर व अनेक शिलालेख आहेत.
७. जालना जिल्ह्यामध्ये अंबड येथे मत्सोदरी देवीचे मंदिर आहे. प्रती वर्षी नवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते येथे एक शिलालेख आढळतो तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार करीत अडीचशे एकर जमीन इनाम दिलेली आहे अंबड हे होळकरांचे खाजगी वतन होते. यावर अरुणचंद्र पाठक यांनी होळकरकालीन अंबड हे पुस्तक लिहलेले आहे.
८. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वनारशी हे ग्रामीण देवस्थान आहे. तिथे अंबड, घनसावंगी, जालना या तालुक्यातील भक्त येतात.
९. पाथरवाला गावची ऐतिहासिक अशी नोंद पुरातत्त्व खात्याकडे असुन यादवाचा सेनापती खोलेश्वरच्या नावाने खोलेश्वर महादेव मंदिर तसेच पार्थ मंदिर आहे. याच गावचे विद्यमान पालकमंत्री राजेश अकुंशराव टोपे हे भूमीपुत्र आहेत.
१०. डोनगाव येथे बोहरी समाजाचा जागतिक स्तरावरील दर्गा आहे.
११. जामखेड येथे कोरीव मुर्तीकाम असलेले खडकेश्वर महादेव मंदिर आहे.
१२. भारतातील एकमेव जांबुवंत मंदिर जामखेड येथे आहे श्रीकृष्ण जांबुवंत यूद्धभूमी म्हणून जामखेडला लौकिक आहे.
१३. चिचंखेड येथे खंडोबा तसेच शिवमंदिर असून सातवाहन काळातील व्यापारी मार्ग असलेले हे गाव आहे. गावात मातीची एका ताम्रपटातुन गावातील समाजजीवनाची माहिती मिळते
१४.सिद्धेश्वर महादेव मंदिर चितळी पुतळी
रत्नदिप सीनेमा घर निलम चित्रपटगृह
पुढारी, लोकमत, सकाळ इत्यादी वृत्तपत्रे
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मत्स्योधरी शिक्षण संस्थेमुळे शिक्षणाच्या सोयी उपलब्ध झाल्या आहेत.
जिल्ह्यातील सर्व भागात शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. जालना जिल्ह्यातील विद्यार्थी सर्व सामान्य बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम हे करताना आढळतात. जिल्ह्यात पॉलिटेक्निकल करणारे विद्यार्थी आहेत. अनेक विद्यार्थी मेडिकल क्षेत्रात आहे. जिल्ह्यातील मत्स्योदरी शिक्षण संस्था, अंबड, घनसावंगी, परतुर, जालना तालुक्यात आहे.
बारवाले संशोधन संस्था जालना औद्योगिक वसाहत येथे आहे. तसेच जालना जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या बदनापूर तालुकयामध्ये मोसंबी संशोधन केंद्र तसेच कडधान्य संशोधन केंद्र आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर इतिहास, संस्कृती, कला संशोधन, वारसा जतन व ग्रंथ, वस्तू संग्रहालय अंबड या संस्थेच्या माध्यमातून इतिहास संशोधक रामभाऊ लांडे जालना जिल्ह्यातील अज्ञात इतिहासावर संशोधन करीत असुन ते मत्स्योदरी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर येथील अध्यासन समितीचे सदस्य आहेत. त्यांनी अनेक शोधनिबंध सादर केलेले असुन मराठा कालखंडातील ऐतिहासिक माहिती संदर्भासहीत पुढे आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
१. जालना येथे राज्य राखीव पोलीस दलाचा गट क्रमांक ३ आहे.
२. महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे.
नगरसेवक राजीनामा हे जालन्याचे भुमिपुञ आहेत.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.