क्रिकेट विश्वचषक, १९७५
From Wikipedia, the free encyclopedia
१९७५ क्रिकेट विश्वचषक (अधिकृत नाव प्रुडेंशियल चषक) आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (आयसीसी) आयोजित क्रिकेट विश्वचषकाचे पहिले आयोजन होते. ही स्पर्धा इंग्लंडमध्ये ७ जून ते २१ जून १९७५ च्या दरम्यान खेळवली गेली. ही स्पर्धा प्रुडंशियल ऍश्युरन्स कंपनी ने प्रायोजित केली व ह्या स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले. सहभागी संघातील ६ संघ कसोटी खेळणारे (ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यू झीलंड, पाकिस्तान व वेस्ट इंडीज) तसेच श्रीलंका व पूर्व आफ्रिका. साखळी सामने ४ संघांच्या २ गटात खेळवले गेले. गट फेरीतील प्रमुख दोन संघ बाद फेरीत गेले.
१९७५ प्रुडेंशियल चषक | |||
---|---|---|---|
१९७५-१९८३ दरम्यानचा प्रुडेंशियल चषक | |||
तारीख | ७ – २१ जून १९७५ | ||
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन | ||
क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (६० षटके) | ||
स्पर्धा प्रकार | साखळी सामने व बाद फेरी | ||
यजमान | इंग्लंड | ||
विजेते | वेस्ट इंडीज (१ वेळा) | ||
सहभाग | ८ | ||
सामने | १५ | ||
प्रेक्षक संख्या | १,५८,००० (१०,५३३ प्रति सामना) | ||
सर्वात जास्त धावा | ग्लेन टर्नर (३३३) | ||
सर्वात जास्त बळी | गॅरी गिलमोर (११) | ||
दिनांक | ७ – २१ जून १९७५ | ||
|
सामने पाढऱ्या कपड्यात खेळवण्यात आले व प्रत्येक डाव ६० षटकांचा होता. सर्व सामने दिवसा खेळवण्यात आले. स्पर्धेच्या इतिहासातील एक विचत्र विक्रम भारतीय फलंदाज सुनिल गावस्करने केला. इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करत ६० षटकात ४ गडी गमावून ३३४ धावा केल्या. सुनिल गावस्करने ६० षटके फलंदाजी केली व १७४ चेंडूत १ चौकाराच्या मदतीने नाबाद ३६ धावा केल्या.
प्रुडेंशियल चषक वेस्ट इंडीजने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला हारवून जिंकला. न्यू झीलंडच्या ग्लेन टर्नर याने सर्वाधिक धावा केल्या तर ऑस्ट्रेलियाच्या गॅरी गिलमोर याने सर्वाधिक गडी बाद केले.