कन्नड विधानसभा मतदारसंघ
महाराष्ट्रातील एक विधानसभा मतदारसंघ / From Wikipedia, the free encyclopedia
कन्नड विधानसभा मतदारसंघ - १०५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, कन्नड मतदारसंघात [छत्रपती संभाजीनगर जिल्हा|छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील]] १. कन्नड तालुका आणि २. सोयगांव तालुक्यातील बनोटी महसूल मंडळ यांचा समावेश होतो. कन्नड हा विधानसभा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[1][2]
शिवसेनेचे उदयसिंह सरदारसिंह राजपूत हे कन्नड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[3]