From Wikipedia, the free encyclopedia
आय.एन.एस विक्रांत (आर ११) (पूर्वीचे एच.एम.एस. हर्क्युलिस (आर ४९)) हे भारतीय नौदलाचे मॅजेस्टिक-वर्गातील, हलके विमानवाहू जहाज होते. हे जहाज सप्टेंबर २२, १९४५ रोजी त्याचे उद्घाटन करण्यात आले. जानेवारी १९५७च्या सुमारास ते ब्रिटिश नौदलाकडून भारताने विकत घेतले. मार्च ४ इ.स. १९६१ रोजी ते उत्तर आयर्लंडात बेलफास्ट येथे असताना युनायटेड किंग्डमातील भारतीय उच्चायुक्त विजयालक्ष्मी पंडित यांनी आय.एन.एस. विक्रांत या नावाने भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल करून घेतले. या जहाजाने इ.स. १९६५ व १९७१ सालांच्या दोन्ही भारत-पाकिस्तान युद्धांत भारतीय नौदलासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली. जानेवारी ३१, १९९७ रोजी ते भारतीय नौदलातून सेवानिवृत्त करण्यात आले. सध्या ते वस्तुसंग्रहालयात बदलवण्यात आले आहे.
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
मूळ देश | |||
---|---|---|---|
वापर |
| ||
Item operated |
| ||
चालक कंपनी | |||
उत्पादक |
| ||
Location of creation | |||
गृह बंदर (पोर्ट) | |||
Country of registry |
| ||
जलयान दर्जा |
| ||
महत्वाची घटना |
| ||
ऊर्जा-संयंत्र |
| ||
उभारीत क्षमता |
| ||
वस्तुमान |
| ||
बीम (रुंदी) |
| ||
पाण्यात बुडलेली खोली |
| ||
लांबी |
| ||
गती |
| ||
महत्तम क्षमता |
| ||
|
या नौकेची बांधणी उत्तर आयर्लंडच्या बेलफास्ट शहरात दुसऱ्या महायुद्धादरम्यान सुरू करण्यात आली. महायुद्ध संपल्यावर बांधणीचे काम स्थगित करण्यात आले व याचा ध्वजक्रमांक R49 बदलून R11 करण्यात आला.
भारताने विकत घेतल्यावर उरलेले बांधकाम हार्लांड अँड वूल्फ या कंपनीने पूर्ण केले.[1] अनेक आधुनिक उपकरणांसह नौकेच्या डेक[मराठी शब्द सुचवा]वर वाफेवर चालणारे विमानफेकी यंत्र (कॅटेपुल्ट[मराठी शब्द सुचवा]) बसवण्यात आले तसेच नियंत्रणकक्षातही आमूळ बदल करण्यात आले.
या नौकेचा प्रथम कमांडिंग ऑफिसर कॅप्टन प्रीतम सिंगच्या नेतृत्वाखाली विक्रांत नोव्हेंबर ३, इ.स. १९६१ रोजी मुंबईच्या बॅलार्ड पियर येथे भारतीय आरमारात दाखल झाले.[2]
विक्रांतवर सुरुवातीला युनायटेड किंग्डमकडून विकत घेतलेली हॉकर सी हॉक प्रकारची लढाऊ-बॉम्बफेकी विमाने तसेच फ्रांसकडून विकत घेतलेली ब्रेग्वे अलिझ प्रकारची पाणबुडीविरोधी विमाने होती. लेफ्टनंट आर.एच. ताहिलियानीने मे १८, १९६१ रोजी पहिले विमान विक्रांतवर उतरवले.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.