माधवराव पेशवे
From Wikipedia, the free encyclopedia
श्रीमंत थोरले माधवराव पेशवे, (जन्म : १६ फेब्रुवारी १७४५; - १८ नोव्हेंबर १७७२), हे मराठी राज्याचे चौथे पेशवे (पंतप्रधान) होते.
हा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.
|
आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
विकिस्रोतावर काय चालेल ?
प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
- ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.
- ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.
- ऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
थोरले माधवराव पेशवे | ||
---|---|---|
छत्रपतींचे पेशवा | ||
माधवराव पेशवे | ||
अधिकारकाळ | जुलै २०, १७६१ - नोव्हेंबर १८, १७७२ | |
राजधानी | पुणे | |
पूर्ण नाव | माधवराव बाळाजी भट (पेशवे) | |
पदव्या | छत्रपतींचे सेवक | |
जन्म | फेब्रुवारी १६, १७४५ | |
मृत्यू | नोव्हेंबर १८, १७७२ | |
थेऊर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र | ||
पूर्वाधिकारी | नानासाहेब पेशवे | |
छत्रपती | रामराजे छत्रपती | |
उत्तराधिकारी | नारायणराव पेशवे | |
वडील | नानासाहेब पेशवे | |
आई | गोपिकाबाई | |
पत्नी | रमाबाई | |
राजघराणे | पेशवा | |
राजब्रीदवाक्य | हर हर महादेव |
बाळाजी बाजीरावास विश्वासराव, माधवराव,व नारायणराव असे तीन पुत्र होते. विश्वासराव हा पानिपतच्या तिसऱ्या युद्धात पडल्यामुळे माधवरावास पेशवाईची वस्त्रे मिळाली. त्या वेळी माधवरावाचे वय अवघे सोळा वर्षांचे असल्यामुळे त्याचा चुलता रघुनाथराव हा कारभार पाहू लागला. वास्तविकपणे माधवराव हा जरी अल्पवयीन होता, तरी तो बुद्धिमान असल्यामुळे त्याने पेशवाईतील घडामोडी मोठया सूक्ष्म रितीने अवलोकन केल्या होत्या. म्हणून राज्यकारभार स्वतः चालविण्याची धमक व बुद्धी ही त्याच्या अंगी होती.माधवरावाने आपल्या कारकिर्दीमध्ये निजाम हैदर अली यांचा बंदोबस्त केला. माधवरावांनी उत्तरे मध्ये मराठ्यांचे प्रभुत्व स्थापित केले. पानिपतच्या लढाईमध्ये झालेला पराभव व त्यातून मराठी सत्तेची झालेली मानहानी भरून काढण्याचे काम व मराठी सत्तेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी विशेष असे प्रयत्न माधवराव पेशवे यांनी केले. मराठ्यांच्या इतिहासात एक प्रामाणिक जिद्दी व प्रजाहित दक्ष असा शासक म्हणून माधवरावांचा उल्लेख केला जातो. नाना फडणीस रामशास्त्री प्रभुणे यांसारखे न्यायाधीश त्यांच्या काळामध्ये तयार झाले. प्रजेला न्याय मिळावा म्हणून न्याय खात्यात सुधारणा माधवरावांनी केली. तोफा व दारुगोळा बनविण्याचे कारखाने त्यांनी सुरू केले त्याचप्रमाणे नाणी पाडण्यासाठी टांकसाळी यांची व्यवस्था केली एकूणच त्यांची कारकीर्द ही मराठी सत्तेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली [1]