दिल्ली
भारत देशाची राजधानी / From Wikipedia, the free encyclopedia
दिल्ली हे उत्तर भारतातील एक महानगर आहे. राजकीयदृष्ट्या दिल्ली शहर एक केंद्रशासित प्रदेश आहे. या शहराचा कारभार केंद्र सरकार, दिल्ली राज्य शासन आणि तीन महानगर पालिका पाहतात. जी नवी दिल्ली भारतीय प्रजासत्ताकाची राजधानी आहे, ती दिल्ली या महानगरातील एक शहरी भाग आहे. दिल्लीची लोकसंख्या सुमारे दीड कोटी (इ.स. २००५चा अंदाज) असून ते जगातील सातवे सगळ्यांत जास्त लोकसंख्या असलेले महानगर आहे.[1][2][3][4] राजधानीचे शहर असल्याने येथे देशातील विविध भागातून नागरिक स्थायिक झाले आहेत, त्यामुळे दिल्ली हे एक बहुसांस्कृतिक महानगर बनले आहे. झपाट्याने झालेले शहरीकरण व वेगाने झालेली प्रगती त्यामुळे दिल्लीचा आर्थिक क्षेत्रात विकास झाला आहे. दिल्लीच्या नागरिकांची सरासरी मिळकत ही राष्ट्रीय सरासरीपेक्षा बरीच जास्त आहे.[5]
जलद तथ्य
?दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र • भारत | |
— मेट्रो — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
१,४८३ चौ. किमी • २५९ मी |
जिल्हे | दिल्लीतील जिल्हे
|
लोकसंख्या • घनता • मेट्रो |
१,३३,००,००० (१ ला) (२०१६) • ७,७५८/किमी२ • २,६४,५४,००० (१ ला) (२००७) |
भाषा | हिंदी, पंजाबी, उर्दू |
मुख्यमंत्री | अरविंद केजरीवाल |
राज्यपाल | तेजेंद्र खन्ना |
स्थापित | १ नोव्हेंबर १९५८ |
विधानसभा (जागा) | Unicameral (७०) |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • UN/LOCODE • आरटीओ कोड |
• ११०००० • +११ • INDEL • DL-xx |
संकेतस्थळ: दिल्ली संकेतस्थळ | |
बंद करा