इंडोनेशिया
आग्नेय आशिया व ओशनियामधील एक देश / From Wikipedia, the free encyclopedia
इंडोनेशिया (अधिकृत नाव: Republik Indonesia; इंडोनेशियाचे प्रजासत्ताक) हा आग्नेय आशिया व ओशनियामधील एक देश आहे. हा देश हिंदी महासागरामध्ये एकूण १७,५०८ बेटांवर वसला आहे. बोर्नियो, जावा, सुमात्रा, सुलावेसी, तिमोर व न्यू गिनी ही येथील प्रमुख बेटे आहेत. इंडोनेशियाची लोकसंख्या सुमारे २३ कोटी असून जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या ह्याच देशात आहे. संस्कृतमध्ये या देशाचे नाव दीपांतर आहे..
इंडोनेशिया Republik Indonesia इंडोनेशियाचे प्रजासत्ताक | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: भिन्नेका तुंगल इका ('विविधतेत एकता') | |||||
राष्ट्रगीत: इंडोनेशिया राया ('महान इंडोनेशिया') | |||||
इंडोनेशियाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी | नुसंतारा | ||||
सर्वात मोठे शहर | जकार्ता | ||||
अधिकृत भाषा | बहासा इंडोनेशिया | ||||
सरकार | अध्यक्षीय प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | जोको विडोडो | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | (नेदरलॅंड्सपासून) ऑगस्ट १७, १९४५ (घोषित) डिसेंबर २७, १९४९ (मान्यता) | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | १९,१९,४४० किमी२ (१६वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | ४.८५ | ||||
लोकसंख्या | |||||
- २००९ | २२,९९,६५,०००[1] (४वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ११९.८/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ९७७.४ अब्ज अमेरिकन डॉलर (१५वा क्रमांक) | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | ४,४५८ अमेरिकन डॉलर (११०वा क्रमांक) | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.७३४[2] (मध्यम) (१११ वा) (२००७) | ||||
राष्ट्रीय चलन | इंडोनेशियन रुपिया (IDR) | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | - (यूटीसी +७ ते +९) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | ID | ||||
आंतरजाल प्रत्यय | .id | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ६२ | ||||
हा देश साडेतीनशे वर्षे डच अधिपत्याखाली होता. मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर इंडोनेशिया स्वतंत्र झाला.
जकार्ता ही देशाची राजधानी आहे. येथील मुख्य भाषा बहासा इंडोनेशिया आहे. हिच्याखेरीज बासा जावा, बासा बाली, बासा सुंडा, बासा मादुरा इत्यादी अनेक भाषा येथे आहेत. येथे कावी नावाची एक प्राचीन भाषा आहे. येथील प्रमुख साहित्यिक ग्रंथ याच भाषेत आहेत. कावी भाषेतील भिन्नेक तुंग्गल इक - विभिन्नतेत एकता - हे या देशाचे घोषवाक्य आहे.
इंडोनेशियामध्ये जगातली एक सर्वांत मोठी जैविक विविधता आहे. आसियान व जी-२० ह्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा इंडोनेशिया हा सदस्य देश आहे.