आगाखान पॅलेस
पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू / From Wikipedia, the free encyclopedia
आगाखान पॅलेस ही पुण्यातील एक महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू आहे.[1] या वास्तूची बांधणी सुलतान मोहम्मद शाह यांनी इ.स. १८९२ मध्ये सुरू केली. १८९७ मध्ये बांधकाम पूर्ण झाले. त्यासाठी बारा लाख रुपये खर्च आला आणि हजारो लोकांना रोजगार मिळाला. १९४२ ते १९४४ या काळात गांधीजी या वास्तूत राहिले असल्यामुळे, या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले.