अँड्रॉईड (इंग्रजी: Android) ही मोबाईल फोनसाठी गूगल कंपनीने विकसित केलेली एक संचालन प्रणाली आहे. ही संचालन प्रणाली लिनक्सवर आधारभूत आहे. गूगलने ही प्रणाली लिनक्सप्रमाणे ठेवण्याचे जाहीर केले आहे.[1] जावा प्रोग्रॅमिंग भाषेसाठी विकासकांना स्वातंत्र्य मिळाले आहे.[3] २१ ऑक्टोबर २००८ला प्रारंभिक आवृत्ती प्रदर्शित करण्यात आली. सध्या ९ डिसेंबर २०१३ रोजी ४.४.२ (जेली बीन) ही आवृत्ती प्रकाशित करण्यात आली आहे. आता मोबाईल पाठोपाठ टॅबलेट पी.सी. साठीही अँड्रॉईड लोकप्रिय होत आहे. वापरकर्त्यांच्या संख्येच्या दृष्टीने आयफोन (आयओएस) खालोखाल दुसरा क्रमांक लागतो. नोकिया, ब्लॅकबेरी ह्या मोठ्या मोबाईल उत्पादक कंपन्या वगळता जगभरातील जवळजवळ सर्व मोठ्या मोबाईल फोन उत्पादकांनी (सॅमसंग, एलजी, सोनी एरिक्सन, मोटोरोला, एचटीसी, डेल, इत्यादी) चालणारे स्मार्टफोन व टॅबलेट पी.सी. तयार केले आहेत.

जलद तथ्य मूळ लेखक, विकासक ...
ॲंड्रॉईड
Thumb
ॲंड्रॉईड (संचालन प्रणाली)
मूळ लेखक गूगल, ओपन हॅन्डसेट अलायन्स
विकासक गूगल
प्रारंभिक आवृत्ती २१ ऑक्टोबर २००८[1]
सद्य आवृत्ती ८.१ (ओरिओ)
(५ डिसेंबर २०१७[2])
सद्य अस्थिर आवृत्ती ॲंड्रॉईड पी (Android P)
प्रोग्रॅमिंग भाषा सी, सी++, जावा
स्रोत पद्धती मिश्र (मुक्तस्त्रोत आणि गुप्तस्त्रोत)
प्लॅटफॉर्म ३२ आणि ६४ बिट ए.आर.एम, x८६ आणि x८६-६४
भाषा इंग्लिश (प्रमुख), १००+ (भाषांतरीत)
सॉफ्टवेअरचा प्रकार मोबाईल संचालन प्रणाली
सॉफ्टवेअर परवाना अपाचे २.०, ग्नू जीपीएल २.० (लिनक्स गाभा आणि त्यामधील बदलांसाठी)
संकेतस्थळ ॲन्ड्रॉइड.कॉम
बंद करा
Thumb
गॅलेक्सी नेक्सस

इ.स. २०१० च्या शेवटी अँड्रॉईड कार्यप्रणाली जगातील सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन प्लॅटफॉर्म बनला आणि त्याद्वारे आधी सुमारे १० वर्षे अधिपत्य गाजवणाऱ्या नोकियाच्या सिंबियन कार्यप्रणालीचे वर्चस्व संपले. कॅनालिस (Canalys) या रिसर्च संस्थेच्या अहवालानुसार इ.स. २०१० च्या शेवटी जगभरातून अँड्रॉईड ३३% स्मार्टफोन विकले गेले तर नोकियाच्या सिंबियनचे ३१% स्मार्टफोन विकले गेले.[4][5]

अँड्रॉईड मुक्त स्रोत असल्यामुळे अँड्रॉईड विकास करण्यासाठी जगभरात खूप मोठ्या संख्येत विकासकांचा समुदाय आहे. अँड्रॉईड फोनसाठी आतापर्यंत २,००,००० पेक्षा जास्त उपयोजने (ऍप्स) उपलब्ध आहेत. त्यातील बहुसंख्य उपयोजने मोफत आहेत.

आवृत्त्या

गूगलतर्फे अधिकृतरित्या ग्राहकांसाठी वितरीत केलेल्या अथवा करणार असणाऱ्या अँड्रॉईड आवृत्त्यांची यादी.[6]

अधिक माहिती नाव, आवृत्ती ...
नावआवृत्ती प्रकाशनाची तारीखसद्यस्थिती
कोणतेही सांकेतिक नाव नाही १.० २३/०९/२००८ कालबाह्य
पेटीट फ़ोर १.१ ०९/०२/२००९ कालबाह्य
कपकेक१.५ २७/०४/२००९कालबाह्य
डोनट[7]१.६ १५/०९/२००९कालबाह्य
इक्लेअर[8]२.० ते २.१ २६/१०/२००९कालबाह्य
फ्रोयो[9]२.२ ते २.२.३ २०/०५/२०१०कालबाह्य
जिंजरब्रेड[10]२.३ ते २.३.७ ०६/१२/२०१०कालबाह्य
हनीकोंब[11]३.० ते ३.२.६ २२/०२/२०११कालबाह्य
आइस्क्रीम सॅन्‍डविच[12]४.० ते ४.०.४ १८/१०/२०११कालबाह्य
जेली बीन[13]४.१ ते ४.३.१ ०९/०७/२०१२कालबाह्य
किटकॅट[14]४.४ ते ४.४.४ ३१/१०/२०१३कालबाह्य
लॉलीपॉप[15]५.० ते ५.१.१ १२/११/२०१४कालबाह्य
मार्शमॅलो[16]६.० ते ६.०.१ ०५/१०/२०१५समर्थित
नौगट७.० ते ७.१.२ २२/१०/२०१६समर्थित
ओरिओ८.० ते ८.१ २१/१०/२०१७समर्थित
पाई९.० ते - ०६/१०/२०१८अंतर्गत विकास आवृत्ती
बंद करा

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.