हिस्पॅनियोला
करिबियन सागरातले बेट / From Wikipedia, the free encyclopedia
हिस्पॅनियोला हे कॅरिबियन समुद्रातील एक बेट आहे. क्युबाच्या पूर्वेस वसलेले हे बेट अँटिल्स बेटांमधील मधील आकाराने दुसऱया क्रमांकाचे आहे.
- हिस्पॅनियोला बेटाबद्दलची माहिती या लेखात आहे. रॉबर्ट लुई स्टीवन्सनच्या ट्रेझर आयलंड कथेतील जहाजासाठी पहा: हिस्पॅनियोला जहाज.
क्रिस्टोफर कोलंबसने डिसेंबर ५, १४९२ रोजी पहिल्यांदा या बेटावर पाय ठेवला. त्यावेळी त्याची (व त्याच्या सहकाऱ्यांची) समजूत होती की ते पृथ्वी-प्रदक्षिणा पूर्ण करून भारतात पोहोचले आहेत. १४९३मध्ये कोलंबस पुन्हा येथे आला व त्याने नव्या जगातील पहिले स्पॅनिश राज्य स्थापन केले.
या बेटाच्या पूर्वेकडील एक-तृतियांश भागात हैती हा देश आहे व उरलेल्या दोन-तृतियांश भागात डॉमिनिकन प्रजासत्ताक आहे.
अधिक माहिती देश, लोकसंख्या (२००२-०७-०१चा अंदाज) ...
देश | लोकसंख्या (२००२-०७-०१चा अंदाज) |
क्षेत्रफळ (कि.मी.²) |
लोकसंख्या घनता (प्रति कि.मी.²) |
राजधानी |
---|---|---|---|---|
हैती | ७०,६३,७२२ | २७,७५० | २५५ | पोर्ट-औ-प्रिन्स |
डॉमिनिकन प्रजासत्ताक | ८७,२१,५९४ | ४८,७३० | १७९ | सांतो दॉमिंगो |
एकूण | १,५७,८५,३१६ | ७६,४८० | २०६ |
बंद करा