![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/a/a4/Eden_Gardens.jpg/640px-Eden_Gardens.jpg&w=640&q=50)
१९९३-९४ हिरो चषक
From Wikipedia, the free encyclopedia
१९९३-९४ हिरो चषक ही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा ७ ते २७ नोव्हेंबर १९९३ दरम्यान भारतामध्ये आयोजित केली होती. बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त सदर स्पर्धा भरवली गेली. यजमान भारतसह, श्रीलंका, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे या पाच देशांचे क्रिकेट संघ सदर स्पर्धेत सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा पराभव करून हिरो चषकावर आपले नाव कोरले.[1] भारताचा कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याला मालिकावीराचा पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात आले.
जलद तथ्य हिरो चषक, तारीख ...
हिरो चषक | |
---|---|
![]() इडन गार्डन्स, बाद फेरीचे स्थळ | |
तारीख | ७ – २७ नोव्हेंबर १९९३ |
व्यवस्थापक | बंगाल क्रिकेट असोसिएशन |
क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने |
स्पर्धा प्रकार | साखळी सामने आणि बाद फेरी |
यजमान |
![]() |
विजेते |
![]() |
सहभाग | ५ |
सामने | १३ |
मालिकावीर | मोहम्मद अझरूद्दीन |
सर्वात जास्त धावा |
![]() |
सर्वात जास्त बळी |
![]() |
बंद करा