सासवड
From Wikipedia, the free encyclopedia
सासवड हे पुण्याजवळचे नगरपरिषद असलेले शहर आहे. हे शहर पुरंदर तालुक्याचे मुख्यालय आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे व पेशव्यांचे वास्तव्य होते तसेच छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म देखील सासवड जवळ पुरंदर किल्ल्यावर झाला होता. सासवड हे पर्यटनासाठी उत्तम स्थान आहे. १७३० साली बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी सासवड मध्ये वाडा बांधला होता आजही तो वाडा सुस्थितीत आहे.