सौदी अरेबियाचा सलमान
From Wikipedia, the free encyclopedia
सलमान बिन अब्दुलअझीझ अल सौद (अरबी: سلمان ابن عبد العزيز آل سعود; ३१ डिसेंबर १९३५) हा पश्चिम आशियातील सौदी अरेबिया देशाचा विद्यमान राजा आहे. २३ जानेवारी २०१५ रोजी सावत्र भाऊ व तत्कालीन राजा अब्दुल्ला ह्याच्या मृत्यूनंतर सलमान राज्यपदावर आला.
जलद तथ्य मागील, जन्म ...
सलमान बिन अब्दुलअझीझ अल सौद | |
विद्यमान | |
पदग्रहण २३ जानेवारी २०१५ | |
मागील | अब्दुल्ला |
---|---|
जन्म | ३१ डिसेंबर, १९३५ (1935-12-31) (वय: ८८) रियाध |
वडील | अल-सौद |
धर्म | सुन्नी इस्लाम |
बंद करा
३१ डिसेंबर १९३५ रोजी रियाध येथे जन्मलेला सलमान अल-सौदचा २५वा मुलगा होता. १९६३ ते २०११ दरम्यान रियाध प्रांताचा राज्यपाल राहिलेला सलमान २०११ पासून सौदी अरेबियाचा संरक्षणमंत्री होता. १६ जून २०१२ रोजी सलमान सौदी राजघराण्याचा युवराज बनला.