मातृका
From Wikipedia, the free encyclopedia
मातृका किंवा सप्तमातृका (इंग्रजी: Matrikas, संस्कृत : मातृका, IAST: mātṝkā.) हा हिंदू धर्मातील सात देवींचा एक समूह आहे. यात आदिशक्तीचे भिन्नभिन्न रुपे आहेत. प्रमुख पुरुष देवतांच्या शक्ती आहेत. ब्रह्मापासून ब्रह्माणी, विष्णूपासून वैष्णवी, शिवापासून माहेश्वरी, कार्तिकेया पासून कौमारी, इंद्रापासून इंद्राणी/ऐन्द्री वराह अवतारापासून वाराही तर देवीपासून चामुंडा अशी शक्ती उत्पन्न झाली. आणि काही ठिकाणी चौसष्ट योगिनीपैकी नारसिंही (प्रत्यंगिरा देवी), देवीचाही अन्य मातृकामध्ये उल्लेख आढळतो. अशा वेळी त्यांना अष्टमातृका असे म्हणतात.[1][2]
सप्तमातृका | |
अन्य नावे/ नामांतरे | अष्टमातृका |
नामोल्लेख | देवीमाहात्म्य, देवी भागवत पुराण, देवी पुराण, महाभारत, मत्स्य पुराण, वराह पुराण, विष्णूधर्मोत्तर पुराण |
शाक्त पंथामध्ये व तांत्रिक संघांमध्ये, सामान्यत: सप्तमातृका पूजल्या जातात. तरीही काहिठिकाणी आठ मातृकांचा (अष्टमातृका) समुह देखील सापडतो. दक्षिण भारतात सप्तमातृकाची उपासना प्रचलित आहे, तर अष्टमातृका नेपाळमध्ये पूजल्या जातात. काही विद्वानांच्या मते ह्या शैव देवी आहेत.[2]