सईबाई भोसले
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी व छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातोश्री / From Wikipedia, the free encyclopedia
सईबाई भोसले (२९ ऑक्टोबर १६३३ – ५ सप्टेंबर १६५९) या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आई होत्या.
![]() |
हा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.
|
आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
विकिस्रोतावर काय चालेल ?
प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
- ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.
- ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.
- ऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.
महाराणी सईबाई भोसले | ||
---|---|---|
महाराणी | ||
![]() | ||
महाराणी सईबाई यांचे अस्सल चित्र | ||
![]() | ||
मराठा साम्राज्य | ||
राजधानी | राजगड | |
पूर्ण नाव | सईबाई शिवाजीराजे भोसले | |
पदव्या | महाराणी | |
जन्म | २९ ऑक्टोबर १६३३ | |
फलटण, महाराष्ट्र | ||
मृत्यू | ५ सप्टेंबर १६५९ (२६ वर्ष) | |
राजगड, महाराष्ट्र | ||
पूर्वाधिकारी | पद निर्माण | |
उत्तराधिकारी | महाराणी सोयराबाई | |
वडील | मुधोजीराव निंबाळकर | |
आई | रेऊबाई निंबाळकर | |
पती | छत्रपती शिवाजी महाराज | |
संतती | सखूबाई निंबाळकर , राणुबाई जाधव , अंबिकाबाई महाडिक , छत्रपती संभाजी महाराज | |
राजघराणे | भोसले | |
चलन | होन |
सईबाई या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील मुधोजीराव नाईक निंबाळकर यांच्या पुत्री होत. निंबाळकर तंजावरच्या पवार कुळातील घराणे आहे. सईबाई यांना तलवार बाजीची आवड होती.[ संदर्भ हवा ] सईबाई यांचा विवाह शिवाजीमहाराजांशी लालमहाल येथे १६ मे १६४० रोजी झाला. त्यावेळी शिवाजी महाराजांचे वय ११ वर्षे तर सईबाईंचे वय ७ वर्षे होते. त्या शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी होत्या. त्यांनी वयाच्या २४व्या वर्षी १४ मे १६५७ रोजी संभाजी महाराजांना जन्म दिला. त्यानंतर सईबाईंची तब्येत बाळांतव्याधी मुळे खालावली. संभाजी महाराज दोन वर्षांचे असताना ५ सप्टेंबर १६५९ रोजी महाराणी सईबाईंचा मृत्यू झाला.[ संदर्भ हवा ]