भारताचे संरक्षणमंत्री
भारत सरकारमधील एक प्रमुख कॅबिनेट मंत्री / From Wikipedia, the free encyclopedia
भारताचा संरक्षणमंत्री हा भारत देशाच्या केंद्र सरकारमधील एक प्रमुख कॅबिनेट मंत्री व भारतीय संरक्षण मंत्रालयाचा प्रमुख आहे. भारत सरकारमधील सर्वात महत्त्वाच्या पदांपैकी एक असलेला संरक्षणमंत्री हा भारताचा लष्करप्रमुख असून भारतीय सशस्त्र सेना व भारतीय तटरक्षक दलासाठी सर्व निर्णय व धोरणे आखण्यासाठी जबाबदार आहे.
जलद तथ्य भारताचे संरक्षणमंत्री Minister of Defence, नियुक्ती कर्ता ...
भारताचे संरक्षणमंत्री
Minister of Defence | |
---|---|
संरक्षण मंत्रालय, भारत सरकार | |
नियुक्ती कर्ता | राष्ट्रपती (पंतप्रधानाच्या सल्लानुसार) |
निर्मिती | २ सप्टेंबर १९४७ |
पहिले पदधारक | बलदेव सिंह |
संकेतस्थळ | संरक्षण मंत्रालयाचे संकेतस्थळ |
बंद करा
संरक्षणमंत्री संसदेच्या लोकसभा अथवा राज्यसभेचा विद्यमान सदस्य असणे बंधनकारक असून त्याची निवड पंतप्रधानाद्वारे व पदनियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते.