शरीरक्रियाशास्त्र
जिवंत प्रणालींच्या कार्ये विज्ञान / From Wikipedia, the free encyclopedia
शरीरक्रियाशास्त्र (इंग्लिश: Physiology, फिजिऑलजी / फिजिओलॉजी ;) हे शरीरशास्त्रांपैकी एक शास्त्र आहे. या शास्त्रामध्ये शरीरातील अववयांच्या क्रियांचा अभ्यास केला जातो. हे एक शास्त्र आहे की ज्यात मानवी शरीरातील अवयवांमधील भौतिक, रचनेतील, जैवरसायनिक बदलांचा पेशी स्तरापर्यंत अभ्यास केला जातो. शरीररचनाशास्त्र हे अवयवांच्या रचनेचा अभ्यास करते तर शरीरक्रियाशास्त्र अवयवांच्या कार्याचा अभ्यास करते.