शंभर वर्षांचे युद्ध
शंभर वर्षांचे युद्ध हा शब्दप्रयोग इ.स / From Wikipedia, the free encyclopedia
शंभर वर्षांचे युद्ध हा शब्दप्रयोग इ.स. १३३७ ते १४५३ दरम्यान चाललेल्या अनेक लढायांचा एकत्रित उल्लेख करण्याकरिता वापरल जातो. हे युद्ध व्हालवाचे घराणे व प्लांटाजेनेटचे घराणे ह्यांदरम्यान फ्रान्सची सत्ता मिळवण्यासाठी लढले गेले. व्हालोईच्या घराण्याने फ्रान्सच्या गादीवर हक्क सांगितला होता तर इंग्लंडमधील प्लांटाजेनेटच्या घराण्याने इंग्लंड व फ्रान्स ही दोन्ही राज्ये आपली आहेत अशी भूमिका घेतली होती.
जलद तथ्य दिनांक, स्थान ...
शंभर वर्षांचे युद्ध
दिनांक | इ.स. १३३७ - १४५३ |
---|---|
स्थान | युरोप (मुख्यतः आजचा फ्रान्स देश) |
परिणती | व्हालोईचा विजय |
युद्धमान पक्ष | |
---|---|
![]() सहकारी: ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() |
![]() सहकारी: ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() लक्झेंबर्ग ![]() |
बंद करा
११६ वर्षे चाललेल्या ह्या युद्धाची परिणती प्लांटाजेनेटच्या फ्रान्समधील हकालपट्टीत झाली. ह्या युद्धाने युरोपचा इतिहास मोठ्या प्रमाणावर पालटला. फ्रान्समधील ५० टक्के जनता १०० वर्षीय युद्धात मृत्यूमुखी पडली.