व्लादिमिर लेनिन
रशियाचे क्रांतिकारी नेते व विचारवंत / From Wikipedia, the free encyclopedia
व्लादिमिर इलिच लेनिन (इस.१८७०-१९२४) हे रशियाचे क्रांतीकारी नेते व विचारवंत होते. यांचे मूळ नाव व्लादिमिर इलिच उल्यानोव्ह असे होते. सोवियत संघाच्या पहिल्या सरकारचे अध्यक्ष असलेले लेनिन सोवियत सोशॅलिस्ट बोल्शेव्हिक पार्टीचे (नंतरच्या सोव्हिएत कम्युनिस्ट पार्टीचे) नेते होते. रशियन राज्यक्रांतीनंतर इ.स १९१७ रोजी त्यांनी सत्ता हस्तगत केली. कम्युनिस्ट विचारसरणीत त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यांचा मृतदेह रशियाच्या लाल चौकात जतन केला आहे. लेनिन हे कुशाग्र बुद्धिमत्तेचे साम्यवादी विचारवंत होते. त्यांचे कार्य जगाच्या इतिहासात खरोखरच अतुलनीय व नेत्रदीपक आहे.
साम्यवाद |