वॉशिंग्टन, डी.सी.
From Wikipedia, the free encyclopedia
वॉशिंग्टन, डी.सी. (इंग्लिश: Washington, D.C.; अधिकृत नावः डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया, District of Columbia) ही अमेरिका देशाची राजधानी आहे. १६ जुलै १७९० रोजी अमेरिकन काँग्रेसने राष्ट्रीय राजधानीसाठी एक संघीय जिल्हा निर्माण करण्यास मान्यता दिली. त्यानुसार मेरीलँड व व्हर्जिनिया राज्यांच्या मधे पोटॉमॅक नदीच्या काठावरील एका जमिनीच्या तुकड्यावर वॉशिंग्टन, डी.सी. शहर वसवले गेले. ह्या शहराला अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन याचे नाव देण्यात आले. डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया हा कोणत्याही राज्याचा भाग नसून एक स्वतंत्र जिल्हा आहे व अनेक वेळा त्याला अमेरिकेचे ५१वे राज्य असे मानले जाते.
वॉशिंग्टन डी.सी. Washington, D.C. |
|||
अमेरिका देशाची राजधानी | |||
डावीकडे-वर : जॉर्जटाउन विद्यापीठ, उजवीकडे-वर : अमेरिकेची राजधानी |
|||
|
|||
वॉशिंग्टन डी.सी.चे अमेरिकामधील स्थान | |||
देश | अमेरिका | ||
जिल्हा | डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया | ||
स्थापना वर्ष | १६ जुलै १७९० | ||
महापौर | व्हिन्सेंट ग्रे | ||
क्षेत्रफळ | १७७ चौ. किमी (६८ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ४०९ फूट (१२५ मी) | ||
लोकसंख्या (२०११) | |||
- शहर | ६,१७,९९६ | ||
- घनता | ३,८८६ /चौ. किमी (१०,०६० /चौ. मैल) | ||
- महानगर | ५५.८ लाख | ||
प्रमाणवेळ | यूटीसी - ५:०० | ||
www.dc.gov |
२०११ साली ६.१८ लाख लोकसंख्या असलेले वॉशिंग्टन हे अमेरिकेमधील २४व्या क्रमांकाचे मोठे शहर तर ५५.८ लाख लोकवस्ती असलेले महानगर क्षेत्र देशात सातव्या क्रमांकावर आहे. अमेरिकन सरकारच्या तीनही प्रशासकीय शाखा (संसद, राष्ट्राध्यक्ष व न्यायालय) वॉशिंग्टन शहरात आहेत. तसेच येथे जगातील १७६ देशांचे दूतावास, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व इतर अनेक जागतिक संस्थांची मुख्यालये आहेत. ह्या व्यतिरिक्त येथे अनेक ऐतिहासिक संग्रहालये व वास्तू आहेत.