विदिशा लोकसभा मतदारसंघ
भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ. / From Wikipedia, the free encyclopedia
विदिशा हा भारत देशाच्या मध्य प्रदेश राज्यातील ८० पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९९१ सालापासून विदिशा हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. माजी भारतीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी येथून सलग ५ वेळा लोकसभेवर निवडून आले होते.
२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्या सुषमा स्वराज ह्यांनी विदिशामधून दुसऱ्यांदा विजय मिळवला.